Advertisement

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३६८ रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी (१८ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३६८ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ३६८ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत शुक्रवारी (१८ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३६८ रुग्ण सापडले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३२,३७१ झाली आहे.

शुक्रवारी बेलापूर ७५, नेरुळ ५२, वाशी ५५, तुर्भे ४३, कोपरखैरणे ६८, घणसोली ४२, ऐरोली २७, दिघामध्ये ६ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २४५ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ८८, नेरुळ ५६, वाशी ४२, तुर्भे ५३, कोपरखैरणे ४५,  घणसोली २९, ऐरोली २३, दिघामधील ९ बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८१२१ झाली आहे. तर मृतांचा आकडा ६८५ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३५६५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८७ टक्के झाला आहे. शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा -

कोरोनाने १० दिवसांत 'इतक्या' ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू

जम्बो कोरोना केंद्रांत 'या' मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टर देणार सेवा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा