Advertisement

कल्याण डोंबिवलीत ३७३ नवे कोरोना रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ३७३ नवीन रुग्ण आढळले. तर ७ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत ३७३ नवे कोरोना रुग्ण
SHARES

 कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ३७३ नवीन रुग्ण आढळले.  तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४२,८०६ झाली आहे. यामध्ये ३८५१ रुग्ण उपचार घेत असून ३८,१२२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व १०१, कल्याण प १००, डोंबिवली पूर्व ९५, डोंबिवली प ६६, मांडा टिटवाळा ६, तर मोहना येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ७ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ९ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ७ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत. हेही वाचा -  

‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबईत आले १.१७ लाख प्रवासी

विक्रोळीत १० हेक्टर क्षेत्रावर कांदळवन लागवडRead this story in हिंदी
संबंधित विषय