Advertisement

नवी मुंबईत शनिवारी कोरोनाचे नवीन ३८१ रुग्ण

नवी मुंबईत शनिवारी (१२ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३८१ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत शनिवारी कोरोनाचे नवीन ३८१ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत शनिवारी (१२ सप्टेंबर) कोरोनाचे नवीन ३८१ रुग्ण सापडले आहेत. तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३०,२९५ झाली आहे.

शनिवारी बेलापूर ६७, नेरुळ ५६, वाशी ४१, तुर्भे ५९, कोपरखैरणे ४८, घणसोली ३३, ऐरोली ७०, दिघामध्ये ७ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३५९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ५१, नेरुळ ८१, वाशी ५१, तुर्भे ६२, कोपरखैरणे ४५,  घणसोली ५९, ऐरोली ३० रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २६१३५ झाली आहे. तर मृतांचा आकडा ६५६ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३५०४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८६ टक्के झाला आहे. नवी मुंबई शहरात आतापर्यंत दीड लाख करोना चाचण्या करण्यात आल्या असून लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचा दर हा महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा - 

Maratha Reservation: सरकारला मराठा आरक्षण कायम राखता आलं असतं, पण…

मराठा आरक्षणासाठी लढा देतच राहू- अशोक चव्हाण


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा