Advertisement

कल्याण डोंबिवलीत ४०५ नवीन रुग्ण, ७ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी कोरोनाचे नवीन ४०५ रुग्ण आढळले. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण डोंबिवलीत ४०५ नवीन रुग्ण, ७ जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मंगळवारी कोरोनाचे नवीन ४०५ रुग्ण आढळले. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.  येथील रुग्णांच्या संख्येने आता ३२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

गेल्या २४ तासांत १५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ३२,३९३ झाली आहे. यामध्ये ४२२५ रुग्ण उपचार घेत असून २७,४७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ६९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ३९, कल्याण प. ११७, डोंबिवली पूर्व १८०, डोंबिवली प ५५, मांडा टिटवाळा ७, मोहना येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०२ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ११ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, ११ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ७ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ७ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.



हेही वाचा -

इमारतींमध्ये राबवली जाणार 'चेस द व्हायरस' मोहीम

महापालिका पुन्हा घेणार कोरोनाग्रस्तांचा शोध



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा