Advertisement

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवीन ४८२ रुग्ण

पालिका क्षेत्रात एका महिन्यात तब्बल ८४९९ रुग्ण वाढले असून १८८ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८८.८७ असून मृत्यू दर १.९५ आहे.

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे नवीन ४८२ रुग्ण
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे नवीन  ४८२ रुग्ण आढळले.  तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पालिका क्षेत्रात एका महिन्यात तब्बल ८४९९ रुग्ण वाढले असून १८८ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८८.८७ असून मृत्यू दर १.९५ आहे.

पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४२,४३३ झाली आहे. यामध्ये ३८९८ रुग्ण उपचार घेत असून ३७,७०९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८२६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन  रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ७७, कल्याण प  १४६, डोंबिवली पूर्व १५८, डोंबिवली प ८५, मांडा टिटवाळा१२, मोहना ३, तर पिसवली येथील एका  रुग्णांचा समावेश आहे.

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०१ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ८ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, २ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत



हेही वाचा -

राज्यात लॉकडाऊनमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढ, ५ ऑक्टोबरपासून हॉटेल सुरू

मुंबईतील 'इतक्या' इमारती टाळेबंदीतून मुक्त 



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा