Advertisement

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ५० रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी (२५ जानेवारी) कोरोनाचे नवीन ५० रुग्ण सापडले आहेत. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५२ हजार ६५८ झाली आहे.

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ५० रुग्ण
SHARES

नवी मुंबईत सोमवारी (२५ जानेवारी) कोरोनाचे नवीन ५० रुग्ण सापडले आहेत.  येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५२ हजार ६५८ झाली आहे.

नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर ७, नेरुळ ९, वाशी १०, तुर्भे ३, कोपरखैरणे ६, घणसोली ६, ऐरोली येथील ९ रुग्णांचा समावेश आहे. तर ७२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १२, नेरुळ १३, वाशी ६, तुर्भे १७, कोपरखैरणे ९,  घणसोली ४, ऐरोली ९, दिघा येथील २ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५०,५७४ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०८१ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८०३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

कोरोनामुळे यंदा पालिकेची तिजोरी रिकामी झाली आहे. विविध करांची वसुली शंभर कोटींनी घटली आहे. आरोग्य व आपत्कालीन व्यवस्थेवर या वर्षी २२१ कोटी खर्च झाला आहे. यात २०१९ या वर्षीच्या तुलनेत १८६ कोटींची वाढ झाली आहे. २०१९ या वर्षात पालिकेने आरोग्य विभागावर फक्त ३० कोटींचा खर्च केला होता. मात्र मार्चनंतर सुरू झालेल्या करोना संकटामुळे डिसेंबरपर्यंत या विभागावर पालिकेचे १०० कोटी रुपये खर्च झाले आहेत.  

कोरोना ही आपत्कालीन परिस्थिती असल्यामुळे पालिकेने आपत्कालीन व्यवस्थेसाठी १२१ कोटींचा खर्च केला आहे. तो २०१९ मध्ये फक्त ५ कोटी इतका होता. त्यामुळे या दोन विभागांवरच पालिकेने २०२० मध्ये २२१ कोटींचा खर्च केला आहे. यात १८६ कोटींची वाढ झाली आहे.



हेही वाचा -

मुंबईत २४ तासात तब्बल 'इतक्या' कावळ्यांचा मृत्यू

हार्बर मार्गावर लवकरच धावणार गोरेगाव-पनवेल लोकल



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा