Advertisement

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ५२ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ५२ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ५२ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन ५२ रुग्ण सापडले आहेत. तर ३ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४९ हजार ७६७ झाली आहे. 

मंगळवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १०, नेरुळ १९, वाशी ५, तुर्भे २, कोपरखैरणे ४, घणसोली ७, ऐरोली ४, दिघातील १ रुग्णांचा समावेश आहे. तर १३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर ३४, नेरुळ १९, वाशी १६, तुर्भे १२, कोपरखैरणे १४, घणसोली ६, ऐरोली ३१, दिघातील ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७,७०५ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०१९ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १०४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

दरम्यान, पालिकेने शहरात १३ कोरोना काळजी केंद्रांसह पालिकेचे वाशी येथील रुग्णालय कोरोनासाठी राखीव ठेवले होते. मात्र आता रुग्णसंख्या कमी झाली असून १३ पैकी ९ काळजी केंद्रे बंद करण्यात आली आहेत. तर वाशी येथील पालिकेचे रुग्णालय सामान्य रुग्णालय केले आहे. आता इतर चार काळजी केंद्रेही बंद करण्यात येणार  आहेत.  बंद करण्यात आलेल्या ९ काळजी केंद्रांतील आरोग्यसेवा देणाऱ्यांना  शहरातील नेरुळ व ऐरोली येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 

वाशी सेक्टर १४, वारकरी भवन बेलापूर, सीबीडी सेक्टर ३, आगरी कोळी भवन, सेक्टर ९ नेरुळ, सावली सेक्टर ५ नेरुळ, समाजमंदिर सेक्टर ५ ऐरोली, ईटीसी केंद्र वाशी, बहुउद्देशीय केंद्र ५ कोपरखैरणे तसेच इंडिया बुल येथे एकही रुग्ण नाही. हेही वाचा -

कोरोना चाचणी आता ७८० रुपयात

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लसRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा