Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ५९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (३ नोव्हेंबर) ५९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ९७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ५९ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (३ नोव्हेंबर) ५९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ९७ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच पनवेल आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ११, नवीन पनवेल ६, खांदा काॅलनी ३, कळंबोली ३, कामोठे २५, खारघर १०,  तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल ५, नवीन पनवेल २६, कळंबोली १५, कामोठे १७, खारघर २६, तळोजा येथील ८ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २३७२३ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २२५३५ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ६३२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

अखेर सीएसएमटी ते अंधेरी-गोरेगाव हार्बर सेवा सुरू

मेट्रो कारशेडचं काम थांबवा, केंद्राने सांगितला जागेवर हक्क



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा