Advertisement

पालिकेच्या टीबी विभागात येणार जीन एक्सपर्ट मशिन


पालिकेच्या टीबी विभागात येणार जीन एक्सपर्ट मशिन
SHARES

सध्या क्षयरोगाच्या (टीबी) रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. मायक्रोबॅक्टेरिया या घातक विषाणूमुळे या आजाराचा प्रादूर्भाव आणखी वाढतो. या आजारावर रुग्णाला शंभर टक्के बरं करण्यासाठी प्रतिबंधक औषधं उपलब्ध असली, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात टीबीच्या रुग्णांचा मृत्यू होत असल्याचं समोर आलं आहे. म्हणूनच, या आजारावरील उपचार पद्धतीला वेग यावा म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या टीबी विभागात 6 अतिरिक्त जीन एक्स्पर्ट मशीन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

टीबीचे 4 प्रकार आहेत. त्यापैकी एमडीआर या लेवलचा टीबी जर रुग्णाला झाला असेल, तर त्याची चाचणी जीन एक्स्पर्ट या मशिनने करणं सोपं होतं. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारमार्फत मंजुरीकरिता केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला. यानुसार प्रस्तावाला केंद्राने मान्यता दिली असून लवकरच जीन एक्स्पर्ट मशीन्स महापालिकेच्या टीबी विभागात दाखल होणार आहेत.   

डॉ. दक्षा शाह, क्षयरोग विभाग प्रमुख, महापालिका

सध्या मुंबईतील 24 प्रभागांपैकी 22 प्रभागांमधील रुग्णालयामध्ये जीन एक्स्पर्ट मशीन्स उपलब्ध आहेत. मात्र टीबीच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आणखी मशीन्स आणण्याचा निर्णय घेतल्याचंही डॉ. शाह यांनी सांगितलं. जीन मशिनच्या संपूर्ण प्रक्रियेला जवळपास 3 तास लागतात.

ही मशिन कशी काम करते, यासंदर्भात Bmedicalpresentations या यूट्यूब चॅनलने एक माहितीपर व्हिडीओ बनवला आहे.


दरम्यान, जीन मशीन्सची सुविधा वाढवण्यासह फिनोटैपिंग टेस्ट देखील होणं गरजेचं आहे. या टेस्टच्या माध्यमातून मानवी शरीरातील टीबीचा जिवाणू किती जुना आहे, याची माहिती मिळू शकेल, असे क्षयरोगतज्ज्ञ डॉ. प्रल्हाद प्रभू यांनी सांगितलं.

रुग्णाच्या शरीरात टीबीच्या विषाणूंचा प्रादुर्भाव कितपत झाला आहे, याबाबत माहिती मिळविण्यासाठी जीन एक्सपर्ट मशीन्स उपयुक्त ठरते.



हेही वाचा

'टीबी' घेतोय रोज 18 मुंबईकरांचा जीव


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा