Advertisement

मुंबईतील 7 वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण

राज्यात एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 3451 आहे.

मुंबईतील 7 वॉर्डमध्ये 200 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण
SHARES
राज्यात एकूण कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 3451 आहे. मुंबईतील जी दक्षिण वाॅर्डमध्ये सर्वाधिक 487 रुग्ण आहेत. तर आर उत्तर वाॅर्डात सर्वाधिक कमी 20 रुग्ण आढळले आहेत. मुंबईत 7 वार्ड असे आहेत जेथे प्रत्येक वाॅर्डात कोरोना रुग्णांची संख्या 200 पेक्षा अधिक आहे. तर 100 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण असलेले 13 वॉर्ड आहेत. 


200 पेक्षा जास्त रुग्ण असलेले वाॅर्ड

जी दक्षिण (वरळी, प्रभादेवी, लोअर परळ) - 487 रुग्ण, 67 रुग्ण बरे झाले

ई वॉर्ड (भायखळा, भायखळा फायर ब्रिगेडच्या आसपासचा भाग) - 349 रुग्ण, 31 रुग्ण बरे

जी उत्तर ( दादर, माहिम, धारावी) - 251 रुग्ण, 19 रुग्ण बरे

एल वॉर्ड ( कुर्ला) - 240 रुग्ण, 8 रुग्ण बरे

एफ उत्तर ( सायन, माटुंगा, वडाळा) - 228 रुग्ण, 16 रुग्ण बरे  

के पश्चिम ( अंधेरी पश्चिम) - 223 रुग्ण, 31 बरे

डी वॉर्ड (नाना चौक ते मलबार हिल परिसर) - 207 रुग्ण, 32 रुग्ण बरे

100 पेक्षा जास्त रुग्ण असलेले वॉर्ड 

के पूर्व ( अंधेरी पूर्व, जोगेश्वरी) - 181 रुग्ण, 38 बरे

एच पूर्व ( वांद्रे पूर्व भाग, वाकोला, कलानगर ते सांताक्रूझ ) - 154 रुग्ण, 16 रुग्ण बरे

एम पूर्व (गोवंडी, मानखुर्द) - 149 रुग्ण, 14 रुग्ण बरे

एफ दक्षिण (परळ, शिवडी) - 119 रुग्ण, 8 बरे

ए वॉर्ड ( कुलाबा, कफ परेड, फोर्ट) - 118 रुग्ण, 3 बरे

एम पश्चिम ( चेंबूर) - 104 रुग्ण, 13 बरे 

पी उत्तर ( मालाड, मालवणी, दिंडोशी) - 97 रुग्ण , 16 रुग्ण बरे

एस (भांडुप, विक्रोळी) 97 रुग्ण, 16 बरे

एच पश्चिम ( वांद्रे, सांताक्रुझ पश्चिम) 79 रुग्ण, 16 बरे

एन ( घाटकोपर) - 76 रुग्ण, 10 बरे झाले

आर दक्षिण (कांदिवली) 71 रुग्ण, 13 बरे

पी दक्षिण (गोरेगाव) - 68 रुग्ण, 13 बरे

बी (मशिद बंदर) - 58 रुग्ण, 7 बरे

आर मध्य (बोरिवली) - 30 रुग्ण, 7 बरे  

टी वॉर्ड ( मुलुंड) - 23 रुग्ण, 5 बरे

सी वॉर्ड (पायधुणी, भुलेश्वर) - 23 रुग्ण, 3 बरे

आर उत्तर (दहिसर) - 20 रुग्ण, 6 बरे 



हेही वाचा -

मास्क न लावणाऱ्या १३३० जणांवर कारवाई

मुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा