Advertisement

कांदिवलीत 3 दिवसांत उभारलं 75 बेडचं कोरोना रुग्णालय

या रुग्णालयात प्रत्येक बेडवर ऑक्सिजन व इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे रुग्णालय केवळ तीन दिवसांत उभारण्यात आलं आहे.

कांदिवलीत 3 दिवसांत उभारलं 75 बेडचं कोरोना रुग्णालय
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कांदिवली पश्चिममधील महावीर नगर परिसरातील पावन धाम मंदिरात 75 खाटांचं कोरोना रुग्णालय उभारण्यात आलं आहे. या रुग्णालयात प्रत्येक बेडवर ऑक्सिजन व इतर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे हे रुग्णालय केवळ तीन दिवसांत उभारण्यात आलं आहे. तसंच हे रुग्णालय सरकारी खर्चाने नव्हे तर पोयसर जिमखाना या स्थानिक संस्थेच्या सहकार्याने बांधलं गेलं आहे.

या रुग्णालयात कमी दरात लोकांवर उपचार केले जाणार आहेत. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत आणि उत्तर मुंबईचे खासदार गोपाल शेट्टी यांनी या रुग्णालयाचं नुकतंच उद्घाटन केलं. यावेळी  खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, या रुग्णालयाच्या माध्यमातून उत्तर मुंबईतील लोकांना या कठीण काळात उत्तम उपचार मिळू शकतील. एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण मुंबईतील लोक दहशतीखाली आहेत. तर दुसरीकडे हे रुग्णालय लोकांची सुविधा आणि आरोग्याची काळजी घेईल. 


डॉक्टर दीपक सावंत म्हणाले की, हे रुग्णालय कमी कालावधीत बांधले गेले हे स्वतःहून एक सुखद आश्चर्य आहे, लोकांना रुग्णालयातून सुविधा मिळतील अशी मला आशा आहे. शासनाकडून काही मदतीची गरज भासल्यास आम्ही त्यासाठी सदैव तत्पर आहोत.

या प्रसंगी आमदार पराग शाह, भाई गिरकर, प्रवीण दरेकर, विलास पोतनिस, सुनील राणे, मनीषा चौधरी हे मान्यवर उपस्थित होते. पावन धामचे ट्रस्टी श्री. दिनेश मोदी व नीरवभाई यांच्यासमवेत डॉ. वाडी वाला, डॉ. बिपिन दोषी, डॉ. व्रजेश शाह अशा मान्यवरांनी सुद्धा उपस्थिती लावली.



हेही वाचा -

महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या नियमांत पुन्हा बदल, मिळाली एमएमआरमध्ये प्रवासाला मुभा

'मिशन बिगीन अगेन'द्वारे नातेवाइकांसाठी सोसायट्यांचे दार उघडे




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा