Advertisement

महाराष्ट्रात आतापर्यंत ८१.८५ लाख कोरोना चाचण्या

राज्यातील कोरोना चाचण्या कमी करण्यात आल्याने रुग्णसंख्या घटत असल्याचं समोर आलं आहे. कोरोना चाचण्यांमध्ये सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात तब्बल १८ टक्क्यांनी घट झाली आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत ८१.८५ लाख कोरोना चाचण्या
SHARES

राज्यातील कोरोना चाचण्या कमी करण्यात आल्याने रुग्णसंख्या घटत असल्याचं समोर आलं आहे. कोरोना चाचण्यांमध्ये सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात तब्बल १८ टक्क्यांनी घट झाली आहे. ऑक्टोबरच्या सुरूवातीच्या काही दिवसात चाचण्यांचे प्रमाण ९१,००० वरुन ७५,००० वर आलं आहे. 

सोमवारी राज्यात केवळ ५ हजार ९८४ रुग्ण आढळले. रविवारी केवळ ४६ हजार ३१२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या घटली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरच्या शेवटच्या १५ दिवसांत १४ लाख चाचण्या करण्यात आल्या. या तुलनेत ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसात चाचण्यांची संख्या ११ लाखांच्या आसपास होती. महाराष्ट्रात आतापर्यंत ८१.८५ लाख चाचण्या करण्यात आल्या आहेत.  सप्टेंबरच्या सुरूवातीच्या आठवड्यात रूग्णांच्या संख्येत १.५ लाखापर्यंत घट झाली आहे. तर १५ ऑक्टोबरपर्यंत हे प्रमाण ७०,००० वर गेले आहे असं राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं. 

महाराष्ट्राच्या नऊ जिल्ह्यांमध्ये झालेल्या पावसामुळेही या चाचण्याचे प्रमाण कमी झालं आहे. सोलापुरात कोविड चाचण्यांची संख्या ही अर्ध्यावर आली आहे. सर्वात जास्त चाचण्या करण्यात येत असलेल्या ठाण्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमाद्वारे स्क्रीनिंग करताना लोकांची रॅपिड अँटिजेन टेस्टही करण्यात येत आहे. तर मुंबईत ऑक्टोबरमध्ये दरदिवशी १५ हजार चाचण्या करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा -

मस्कचा वापर न करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना पालिका कर्मचाऱ्यांची होतेय दमछाक

प्रवाशांची एसी लोकलकडे पाठ; कोरोनाच्या भीतीनं सध्या लोकलला प्राधान्य



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा