Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ८३ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२८ ऑक्टोबर) ८३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १५६ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी ८३ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत बुधवारी (२८ ऑक्टोबर) ८३ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून १५६ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच ४ मृत्यूंची नोंद झाली असून यामध्ये कळंबोलीतील २ तसेच खांदा कॉलनी आणि कामोठे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील २१, नवीन पनवेल ७, खांदा काॅलनी ५, कळंबोली १२, कामोठे १५, खारघर २१,  तळोजा येथील येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल २८, नवीन पनवेल २५, कळंबोली ११, कामोठे ३९, खारघर ४९ तळोजा येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २३२७९ कोरोनाबाधित रूग्णांपैकी २१९३७ रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ५४४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७९८ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. हेही वाचा - 

कोरोना इफेक्ट : रुग्णांमध्ये आढळतोय मल्टीसिस्टम प्रक्षोभक सिंड्रोम

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचाRead this story in हिंदी
संबंधित विषय