Advertisement

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ८८ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (२८ जानेवारी) कोरोनाचे नवीन ८८ रुग्ण सापडले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला.

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ८८ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत गुरूवारी (२८ जानेवारी) कोरोनाचे नवीन ८८ रुग्ण सापडले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला.  येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५२ हजार ८५८ झाली आहे.

नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १४, नेरुळ १८, वाशी ९, तुर्भे ९, कोपरखैरणे ८,  घणसोली ११, ऐरोली ८, दिघा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. तर ४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १८, नेरुळ १, वाशी ५, तुर्भे ४, कोपरखैरणे ८,  घणसोली २, ऐरोली ५, दिघा येथील १ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५०,९६२ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०८३ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८१३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबईतील १२ कोरोना काळजी केंद्रे बंद केल्यानंतर आता नागरी आरोग्य केंद्रांतीलही रुग्णसंख्या घटली आहे. यात झोपडपट्टी भागात अत्यल्प करोना रुग्ण शिल्लक आहेत. इंदिरानगर केंद्रात एकही रुग्ण नाही तर चिंचपाडा, इलठणपाडा, कातकरीपाडा व तुर्भे या केंद्रात दहापेक्षा कमी रुग्ण आहेत. 

दिवाळीपूर्वी खाटा मिळण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत होती. आता ८५ टक्के खाटा रिकाम्या आहेत. फक्त वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात उपचार एकवटले आहेत. अत्यवस्थ रुग्णांवर नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



हेही वाचा -

सामान्यांना पालिका मुख्यालयाची इमारत आतून पाहण्याची संधी

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांना 'या' भागात धोका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा