नवी मुंबई पोलीस दलातील 91 पोलीस कर्मचारी-अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 72 पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. यातील फक्त एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात पोलिस ड्युटीवर आहेत. त्यामुळे अनेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. काराज्यात सर्वच जिह्यामध्ये पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचं दिसून येत आहे. काही पोलिसांचा मृत्यू देखील झाला आहे. नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मागील अडीच महिन्याच्या कालावधीत नवी मुंबई पोलीस दलातील 91 पोलीस कर्मचारी अधिकारी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना लागण झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
नवी मुंबई पोलीस दलात कोरोनाची लागण झालेल्यामध्ये 3 पोलीस अधिकारी, 45 पोलीस कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्याच कुटुंबातील 43 व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकी 1 पोलीस अधिकारी, 36 पोलीस कर्मचारी व 35 पोलीस कुटुंबीय असे 72 जण बरे झाले आहेत. फक्त एका पोलीस कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाची लागण झालेल्या नवी मुंबई पोलीस दलातील 2 पोलीस अधिकारी, 9 पोलीस कर्मचारी व 7 पोलीस कुटुंबातील व्यक्ती अशा 18 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दिव्यांगासाठी राज्यातील पहिले कोविड रूग्णालय नवी मुंबईत
वाशीमध्ये विशेष कोविड रुग्णालय सुरू, 'इतक्या' खाटांची असेल व्यवस्था