Advertisement

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ९२ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ९२ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ९२ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ९२ रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५० हजार ५४४ झाली आहे. 

गुरूवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर २१, नेरुळ २०, वाशी ११, तुर्भे ९, कोपरखैरणे १०, घणसोली १०, ऐरोलीतील ११ रुग्णांचा समावेश आहे. तर ६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १५, नेरुळ १५, वाशी २, तुर्भे ९, कोपरखैरणे ८, घणसोली १०, ऐरोली ६, दिघातील १ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८,४९८ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०४० झाला आहे. नवी मुंबईत सध्या १००६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

दिवाळीपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना  दिवाळीनंतर पुन्हा वाढला होता. मात्र  ही परिस्थिती नियंत्रणात येत आहे. यामुळे शहरातील १३  कोरोना काळजी केंद्रांपैंकी अकरा केंद्रे बंद करण्यात आली आहेत. वाशी महापालिका रुग्णालयही सामान्य रुग्णालय करण्यात आले आहे. आता शहरात दोनच ठिकाणी कोरोनावर उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, कोरोनाच्या लसीकरणासाठी पालिका प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ही लस पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणार असून त्यासाठी २० हजार कर्मचाऱ्यांची नावनोंदणी पूर्ण करण्यात आली आहे.यात अधिकारी,डॉक्टर्स, कर्मचारी, परिचारिका, आशा व अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच शहरातील खासगी आरोग्यसेवेशी निगडित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 



हेही वाचा -

मुंबईत आलेल्या 'त्या' प्रवाशांसाठी वॉर्ड वॉर रूम

मुंबई लोकलच्या दिव्यांग डब्यात सीसीटीव्ही



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा