Advertisement

धारावी, माहीम, दादरमध्ये 'या' ठिकाणी सापडले नवीन रुग्ण

सोमवारी मुंबईतील धारावी, दादर आणि माहीममध्ये कोरोनाचे नवीन ९६ रुग्ण आढळले आहेत.

धारावी, माहीम, दादरमध्ये 'या' ठिकाणी सापडले नवीन रुग्ण
SHARES

सोमवारी मुंबईतील धारावी, दादर आणि माहीममध्ये कोरोनाचे नवीन ९६ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये धारावीतील ४२ रुग्ण असून धारावातील रुग्णांची संख्या आता १५८३ झाली आहे. दादरमध्ये २० रुग्ण आढळल्याने येथील रुग्णांची संख्या २३९ झाली आहे. तर माहीममध्ये ३४ नवे रुग्ण सापडल्याने येथील रुग्णांची संख्या ३५१ वर गेली आहे. समाधानकारक बाब म्हणजे या ठिकाणी एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

धारावीत सोमवारी बलिगा नगर, साथी हौसिंग सोसायटी, होळी मैदान, पंचशील सोसायटी, मंगल कैलाश बिल्डिंग, शास्त्रीनगर, भीम नगर, म्युनिसिपल चाळ, मेघवाडी, शांती नगर, धारावी क्रॉस रोड, पीएमजीपी कॉलनी, संघम गल्ली, ढोरवाडा, प्रेम मिलन बिल्डिंग, प्रगती नगर, शेठवाडी चाळ, महात्मा गांधी हौसिंग सोसायटी, सोशल नगर, वैभव सोसायटी, कल्पतरू बिल्डिंग, सिता निवास चाळ, राजीव गांधी नगर, कोल्हापूर लेन आणि धारावी मेन रोड येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर शाहू नगर आणि रजीब अली चाळ येथे प्रत्येकी दोन, कुंभारवाडा येथे ५ आणि माटुंगा लेबर कँम्प येथे ८ रुग्ण सापडले.

माहीम येथील दालमिया रोड, आझाद नगर, मोरी रोड, पॅराडाइज अपार्टमेंट, सागर हौसिंग सोसायटी, माहीम कॉजवे, जिजाई निवास, नवजीवन कामगार चाळ, कोटणीस मार्ग, रोहिरा हाऊस, मनमाला टॉवर, माहीम पोस्ट ऑफिस, कादरी मेन्शन, ब्रह्मदेव सोसायटी, गिरगावकर वाडी आणि कापड बाजार येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर एलजे रोड आणि लोकमान्य नगर येथे प्रत्येकी २, निर्वाण हौसिंग सोसायटी येथे ३, मोगल लेनमध्ये ४ आणि माहीम पोलीस कॉलनीत ७ रुग्ण सापडले.

 दादरमध्ये अनमोल सोसायटी, उद्यम बिल्डिंग, आशीर्वाद हौसिंग सोसायटी, त्रिवेणी संगम, शिंदेवाडी, एमडी बिल्डिंग, भवन चाळ, उपेंद्र नगर, फर्नांडीस चाळ, ईराणी बिल्डिंग, इंद्रायणी हौसिंग सोसायटी, नीळकंठ बिल्डिंग, दादर पोलीस स्टेशन आणि भगवानदास वाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तर सुखशांती बिल्डिंग, एसके बोले रोड आणि विजय नगर येथे प्रत्येकी दोन रुग्ण सापडले आहेत.



हेही वाचा -

एमएमआरसीकडून २ कोविड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी
ताजच्या मोफत जेवणाची मुदत संपली, निवासी डॉक्टरांना घरून डबे आणण्याची सूचना




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा