खासगी रुग्ण्यालयांच्या मनमानीला चाप

 Vidhan Bhavan
खासगी रुग्ण्यालयांच्या मनमानीला चाप

मुंबई - शस्त्रक्रियेसाठी लागणारी स्टेन्टची किंमत एमआरपीपेक्षा जास्त लावणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, "मुंबईत आठ अशा मोठ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये लीलावती, फोर्टीस, कोकिलाबेन, ब्रिच कँडी, एल. एच. हिरानंदानी, एच. एन. रुग्णालय, एशियन हार्ट आणि ग्लोबल या रुग्णालयांचा समावेश आहे. ज्यांनी स्टेन्टच्या एमआरपीपेक्षा जास्त किंमती लावून लोकांना लुबाडले आहे. आठही रुग्णालाये 50 हजार ते 90 हजार रुपयांचे स्टेन्टच्या रुग्णांना 1.50 लाख ते 1.90 लाखापर्यंत विकत होते." राज्य सरकारने या रुग्णालयांच्या विरोधात ग्राहक संरक्षण कायद्यानुसार कारवाई केली आहे.

या वेळी गिरीश बापट यांनी मान्य केले की अन्न आणि औषध प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अशा रुग्णालयांवर त्वरित कारवाई करता येत नाही. अशावेळी काही माजी अधिकारी आणि सामाजिक संस्थांची मदत घेतली जात आहे. जनतेत जागृकता निर्माण व्हावी यासाठी सर्व रुग्णालयात नियम आणि तक्रार करण्यासाठी नंबरांची नोटीस लावण्यात आली आहे, जेणेकरून पीडित व्यक्ती तक्रार करू शकतील.

Loading Comments