Advertisement

इथून पसरला कोरोना व्हायरस, खुद्द चीननेच केला खुलासा

कोरोना विषाणू नेमका तयार झाला कसा? यामागे कुणाचा हात आहे? हे अद्याप अधिकृतरित्या कळलेलं नसलं, तरी चीनमधील एका वेबसाइटने यामागचा उलगडा केला आहे.

इथून पसरला कोरोना व्हायरस, खुद्द चीननेच केला खुलासा
SHARES

धोकादायक कोरोना विषाणूच्या संक्रमणाने (Corono virus) चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. हा विषाणू जगभरातील अन्य देशांमध्येही हातपाय पसरत असल्याने सर्वजण चिंताग्रस्त झाले आहेत. साधारण महिन्याभरापूर्वी हा विषाणू चीनमध्ये (china) पसरण्यास सुरूवात झाली होती. पण हा विषाणू नेमका तयार झाला कसा? यामागे कुणाचा हात आहे? हे अद्याप अधिकृतरित्या कळलेलं नसलं, तरी चीनमधील एका वेबसाइटने यामागचा उलगडा केला आहे. 

हेही वाचा- कोरोनाचे आणखी ४ संशयित रुग्ण

या विषाणूची लागण होऊन जगभरात आतापर्यंत शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात चीनमधील ६०० हून अधिक जणांचा समावेश असून ३० हजारांहून अधिक चीनी (china) नागरिकांना या धोकादायक विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूवर अद्याप कुठलाही उपचार उपलब्ध नसल्याने या संख्येत आणखी भर पडण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. हा विषाणू केवळ चीनसाठीच नाही, तर जगासाठीही धोक्याचा ठरू शकतो, असा इशारा देणारे चीनमधील डाॅक्टर ली वेन लियांग (doctor li wenliang) यांचा दुर्दैवाने गुरूवारी मृत्यू झाला. कोरोना विषाणूची लागण झाल्यानेच उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. 

 

डाॅक्टर ली वेन लियांग यांनी महिन्याभरापूर्वी एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओतून कोरोना विषणापासून (Corono virus) वाचण्यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. परंतु त्यांची माहिती खोटी असून अफवा पसरवण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं हाेतं. पण त्यांचा हा इशारा आता खरा ठरल्याचंच दिसत आहे. या पेक्षा भयानक बाब म्हणजे कोरोना विषाणूची लागण झालेल्या ३० हजार नागरिकांना मारण्यासाठी चीनी (china government) सरकारने न्यायालयात याचिका दाखल केल्याची जगभर चर्चा आहे. 

हेही वाचा- कोरोनावर उपचाराचे व्हायरल मेसेज खोटे

त्यातच हा विषाणू नक्की कुणाच्या इशाऱ्याने आणि कुठल्या उद्देशाने बनवण्यात आला याचा खुलासा एका चीनी वेबसाईटने केला आहे. जी न्यूज नावाच्या वेबसाईटने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार हा विषाणू डेयीन ग्यो (scientist deyin guo) नावाच्या वैज्ञानिकाने बनवला आहे. सार्स (sars virus) सारख्या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना विषाणूवर संशोधन सुरू होतं, असंही म्हटलं जात आहे. हा विषाणू बनवण्यासाठी त्यांना १० वर्षांचा कालावधी लागला. चीनचे उपराष्ट्रपती वांग की शान (wang qishan) यांनी या विषाणूचा हल्ला करण्याचे आदेश दिल्याचंही म्हटलं जात आहे. पण या बातमीला दुजोरा मिळू शकलेला नाही.


एवढंच नाही, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाने (communist party of china) हा विषाणू चीनचं जैविक हत्यार (biological weapons china) असल्याची कबुली दिली आहे. परंतु हा विषाणू चीनने नाही, तर अमेरिकेने तयार केल्याचा आरोपही केला आहे. या विषाणूची लागण झालेला पहिला रुण वुहान (wuhan) मध्ये आढळला होता. त्याआधी उपराष्ट्रपती वांग (wang qishan) यांनी वुहानचा गुप्त दौरा केला होता. तिथं पी ४ प्रयोगशाळा असून ही प्रयोगशाळा वुहानमधील सीफूड मार्केटपासून २० मैल अंतरावर आहे. मानवी चुकीमुळे या प्रयोगशाळेतून हा विषाणू बाहेर पडल्याचं कम्युनिट पार्टी आॅफ चायनाने मान्य केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने वुहानमध्ये (wuhan) अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचे दोन विमान पाठवले होते. या विमानातून ६५४ नागरिकांना दिल्लीत आणण्यात आलं होतं. यामध्ये ७ परदेशी नागरिकांचाही समावेश होता. चांगली बाब म्हणजे यापैकी एकाही व्यक्तीला या विषाणूची लागण झालेली नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा