Advertisement

जोगेश्वरी, अंधेरीत आणखी २ कोविड सेंटर उभारण्याची तयारी

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने जोगेश्वरी आणि अंधेरीत आणखी २ कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

जोगेश्वरी, अंधेरीत आणखी २ कोविड सेंटर उभारण्याची तयारी
SHARES

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने (bmc) जोगेश्वरी आणि अंधेरीत आणखी २ कोविड सेंटर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. याकरीता महापालिकेकडून जागेचा शोधही सुरू करण्यात आला असून महापालिकेला हवी तशी जागा देखील मिळाल्याचं म्हटलं जात आहे.

के वाॅर्डमध्ये येणाऱ्या जोगेश्वरी आणि अंधेरीतील नागरिकांसाठी २ कोविड सेंटर उभारण्यात येतील, ज्यामध्ये २६० बेड्सचा समावेश असेल. तर यापैकी १३० बेड्सला आॅक्सिजनची व्यवस्था असेल. महापालिका अशा जागेवर हे कोविड सेंटर उभारत आहे, ज्याचा फायदा जोगेश्वरी, अंधेरी आणि विले पार्लेतील रहिवाशांनाही या सेंटरचा उपयोग होईल. हे कोविड सेंटर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उभारण्यात येईल.

सद्यस्थितीत के वाॅर्डात अशी ३० कोविड सेंटर्स आहेत, ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येतात. या वाॅर्डात दिवसाला ६०० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. 

हेही वाचा- मालाड, सायन आणि कांजूरमार्गमध्ये पालिका उभारणार ३ जम्बो कोविड सेंटर

कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी या वाॅर्डातील महापालिकेची बाजार इमारत आणि कम्युनिटी सेंटर कोविड सेंटरमध्ये बदलण्यात आलं आहे. के वाॅर्डातील वाढती रुग्णसंख्या (coronavirus) लक्षात घेऊन बेड्सच्या संख्येतही वाढ करण्यात यावी, अशी मागणी करणारं पत्र अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना लिहिलं होतं. त्यानंतर या हालचाली सुरू झाल्या.

याव्यतिरिक्त, महापालिकेकडून पुढच्या महिन्यापर्यंत कांजूरमार्ग, मालाड आणि सायनमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्याचं काम सुरू आहे. या जम्बो सेंटरमध्ये ७० टक्के बेड्स ऑक्सिजन सुविधेसह ठेवण्याची योजना आहे. तर उर्वरित युनिट (आयसीयू) बेड आणि व्हेंटिलेटरची सुविधा असलेले बेड असतील. याअंतर्गत सुमारे ५ हजार ३०० बेडची व्यवस्था होणार आहे.

सध्या मुंबईत दहिसर जम्बो सेंटर, दहिसरमधील कांदरपाडा जम्बो सेंटर, गोरेगाव इथलं नेस्को जम्बो सेंटर, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) जम्बो सेंटर, एनएससीआय वरळी जम्बो सेंटर आणि मुलुंड जम्बो सेंटर अशी ६ जम्बो सेंटर्स आहेत.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा