शताब्दी रुग्णालयात रांगेत रुग्ण बेहाल

 Kandivali
शताब्दी रुग्णालयात रांगेत रुग्ण बेहाल

कांदिवली - शासकीय रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अनेकदा रुग्णांना तासंतास रांगेत ताटकळत थांबून राहावं लागतं. याचाच प्रत्यय कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयात आला आहे. माला झा या महिलेला मारहाण झाली होती. या प्रकरणी कांदिवली महिला कॉन्स्टेबल एसपी जाधव यांनी तिला तपासणीसाठी या रुग्णालयात आणलं होतं. मात्र सर्जन उपस्थित नसल्याने एका स्वाक्षरीसाठी पोलीस काँस्टेबलला रात्री 8 वाजल्यापासून ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत ताटकळत वाट पाहावी लागली. जेव्हा काही वेळानंतर रुग्णालयाच्या अधिक्षकांशी संपर्क साधल्यानंतर साडेतीन तास वाट पाहिल्यानंतर सर्जनने रिपोर्टवर स्वाक्षरी केली.

Loading Comments