वर्तमानपत्रात गुंडाळलेले पदार्थ धोकादायक


  • वर्तमानपत्रात गुंडाळलेले पदार्थ धोकादायक
SHARE

मुंबई - वर्तमानपत्रात बांधून दिले जाणारे हे पदार्थ खायला चविष्ट वाटत असले तरी वर्तमानपत्रात गुंडाळले जाणारे हे पदार्थ किती धोकादायक आहेत याचा अंदाजही तुम्हाला नसेल. वर्तमानपत्रात गुंडाळलेले पदार्थ शरिरात विष पेरण्याचं काम करतात. यामुळे कॅन्सर होऊ शकतो, हे आम्ही नाही खुद्द एफएसएसआय अर्थातच द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऑफ इंडियानं म्हटलंय.

प्रामुख्यानं रस्त्यावर जे पदार्थ मिळतात ते वर्तमानपत्रात बांधून दिले जातात. पण वर्तमानपत्रांच्या छपाईसाठी जी शाई वापरली जाते ती हानीकारक असते. आणि त्यामुळे पदार्थ देण्यासाठी वर्तमानपत्र टाळाण्याचं आवाहन केलं जातंय.
रस्त्यावरचे पदार्थ कसे बनवले जातात आणि कशाप्रकारे ग्राहकांना दिले जातात हे पाहणं आवश्यक आहे. त्यामुळे पदार्थ बांधून देण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर टाळणं गरजेचं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या