Advertisement

अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्याची कोरोनावर मात

कोरोनामुळं बेस्ट उपक्रमातील आतापर्यंत १६५८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.

अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्याची कोरोनावर मात
SHARES

मागील २ महिने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देणाऱ्या ५५ वर्षीय दिलीप पायकुडे या बेस्ट कर्मचाऱ्यानं अखेर कोरोनावर मात केली आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या रस्त्यावर धावत होत्या. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कार्यालयात वेळेवर पोहोचता यावं यासाठी दिलीप पायकुडे दररोज कामावर हजर राहत होते.

२७ जून रोजी त्यांना अचानक ताप येऊन श्वासनाचा त्रास सुरू झाला. काही तासांतच त्यांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथंही त्यांची प्रकृती खालावल्यामुळं मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयात १७ दिवस व्हेंटिलेटरवर आणि ४३ दिवस ऑक्सिजनवर काढल्यानंतर पायकुडे यांनी कोरोनावर मात केली. बुधवारी त्यांना डिस्चार्ज मिळाला. आता पुढील १४ दिवस त्यांना होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे.

बेस्टमधील ९० टक्के कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहेत. तसंच, सध्या ११८ कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयात १७ दिवस व्हेंटिलेटरवर आणि ४३ दिवस ऑक्सिजनवर काढल्यानंतर पायकुडे यांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. आता पुढील १४ दिवस त्यांना होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतप मुंबईत लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमुळं वाहतूक सेवा बंद झाली. मात्र, बेस्टनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आपली वाहतूक सेवा सुरू ठेवली. मागील ५ महिने बेस्टच्या कर्मचाऱ्यांना आपल्या जीवाची बाजी लावत मुंबईकरांना सेवा दिली. परंतु, त्यांनाही कोरोनानं आपल्या विळख्यात ओढलं. कोरोनामुळं बेस्ट उपक्रमातील आतापर्यंत १६५८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी ९० टक्के कर्मचारी बरे होऊन घरी परतले असल्याचा दावा बेस्ट प्रशासनाने केला आहे.



हेही वाचा -

सणासुदीला मुंबईच्या बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट

लोकल सेवा सुरू झाली तरी, रेल्वे स्थानकांवर मर्यादित प्रवेश


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा