Advertisement

बोगस 'लॅब'पासून सावध रहा! पॅथॉलॉजिस्ट संघटनेचा सल्ला

सद्यस्थितीत व्हायरल फिव्हर जरी असला, तरी डाॅक्टर रक्त चाचण्या करायला सांगतात. त्यामुळे लॅबमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. पण, लॅबमध्ये रक्त तपासणीसाठी जात असताना तिथं रक्त तपासणीसाठी निव्वळ तंत्रज्ञ आहे की योग्य डॉक्टर आहेत याची खातरजमा देखील करून घ्या, असा सल्लाही पॅथॉलॉजिस्ट संघटना देत आहेत.

बोगस 'लॅब'पासून सावध रहा! पॅथॉलॉजिस्ट संघटनेचा सल्ला
SHARES

रक्त, लघवी आदी घटकांची तपासणी करून रोगनिदान करणाऱ्या अनधिकृत प्रयोगशाळा (पॅथाॅलाॅजी लॅबोरेटरी) रुग्णांच्या आरोग्य हक्कांचा भंग करत आहेत. त्यामुळे आरोग्य तपासणी करताना अशा बोगस 'लॅब'पासून सावध राहण्याचा इशारा पॅथाॅलाॅजी संघटनांनी दिला आहे. राज्य मानवी हक्क आयोगाने अशा बोगस लॅबवर ताशेरे ओढूनही त्यांचे अनधिकृत धंदे सुरूच असल्याकडेही संघटनांनी लक्ष वेधेलं आहे.

तंत्रज्ञ आहे का?

सद्यस्थितीत व्हायरल फिव्हर जरी असला, तरी डाॅक्टर रक्त चाचण्या करायला सांगतात. त्यामुळे लॅबमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. पण, लॅबमध्ये रक्त तपासणीसाठी जात असताना तिथं रक्त तपासणीसाठी निव्वळ तंत्रज्ञ आहे की योग्य डॉक्टर आहेत याची खातरजमा देखील करून घ्या, असा सल्लाही पॅथॉलॉजिस्ट संघटना देत आहेत.

रक्त तपासणी कुणी करावी?

रुग्णाची तपासणी करणारे डाॅक्टर एमडी, डीसीपी, डीपीबी, पदवीपात्रच असायला हवेत. लॅबमध्ये प्रशिक्षित मान्यताप्राप्त डॉक्टर आहे का? याची विचारणा रुग्णाने केली पाहिजे. डीएमएलटी, सीएमएलटी हे प्रशिक्षण घेतलेले तंत्रज्ञच लॅबमध्ये असायला हवेत. एखाद्या लॅबमध्ये या पदव्या घेतलेले डॉक्टर्स नसतील, तर अशा अनधिकृत 'लॅब'वर कारवाई करण्यात येईल, पॅथॉलॉजिस्ट सांगतात.

योग्य डाॅक्टरचा आग्रह धरा

तंत्रज्ञांनी स्वतंत्ररित्या लॅबोरेटरी चालवून पॅथॉलॉजिस्टनी प्रमाणित केल्याशिवाय अहवाल देणं बेकायदेशीर असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने आधीच सांगितलं आहे. रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या लॅबबाबत माहिती मिळवून मगच आरोग्य तपासणी करा. योग्य डॉक्टरच्या सहीचा आरोग्य अहवाल प्रमाण माना, असाही सल्ला महाराष्ट्र असोसिएशन अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटेनेने दिला आहे.

हेही वाचा-

डाॅक्टरांनो, रूग्णांना अधिकृत पॅथाॅलाॅजी लॅबमध्येच पाठवा, नाही तर याल गोत्यात...

मुंबईतील १४ शाळांमध्ये 'अटल टिंकरिंग लॅब'

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा