Advertisement

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण

मागील आठवड्यात काकाणी यांनी कोविडची चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण
SHARES

कोरोनाविरोधी लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू असून. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मागील आठवड्यात काकाणी यांनी कोविडची चाचणी केली होती. ती पॉझिटिव्ह आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबईत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून पहिल्या दिवसापासून काकाणी यांनी या लढ्यात स्वताला झोकून दिलं आहे. महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांच्या नेतृत्वाखाली काकाणी यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाची संपूर्ण जबाबदारी गेले दीड वर्षे यशस्वीरित्या सांभाळली. विविध उपाययोजनांमुळं मुंबईत पहिली व दुसरी लाट लवकर आटोक्यात आली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिल्याने त्यादृष्टीने मुंबई महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. करोना चाचण्यांची आणि प्रत्येक बाधितांच्या संपर्कातील २० व्यक्तींचा शोध घेण्याचे आदेश पालिकेने सात परिमंडळ आणि २४ विभागांना दिले आहेत. निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्या वाढण्याचा धोका लक्षात घेऊन पालिकेने खाटांची संख्या वाढविण्याची तयारी सुरू केली आहे. यासंबंधीची बैठक पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी घेतली होती.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा