Advertisement

३१ डिसेंबरच्या जल्लोषावर कोरोनाचं सावट, रुग्ण वाढण्याची शक्यता - पालिका

नवीन वर्षाच्या आधी म्हणजे डिसेंबरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढेल अशी भिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं व्यक्त केली आहे.

३१ डिसेंबरच्या जल्लोषावर कोरोनाचं सावट, रुग्ण वाढण्याची शक्यता - पालिका
SHARES

मुंबईत सध्या covid 19 रुग्णांची संख्या कमी होतेय. पण नवीन वर्षाच्या आधी म्हणजे डिसेंबरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढेल अशी भिती बृहन्मुंबई महानगरपालिकेनं व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये नवीन वर्ष साजरा करण्यास परवानगी देण्यात येईल की नाही याबाबत अंतिम आढावा डिसेंबरनंतर घेण्यात येईल. डिसेंबर महिन्यात COVID 19 रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्याचं लक्षात आल्यास अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, नवीन वर्षाच्या उत्सवावर काही प्रतिबंध लागू शकतात.

“डिसेंबरमध्ये दुसरी लाट आल्यास आम्ही त्या अनुषंगानं नवीन वर्षाचे उत्सव मर्यादित करू. जर कोरोना रुग्णांचे आकडे स्थिर असतील तर काही निर्बंधासह उत्सवांना परवानगी दिली जाऊ शकते, ”असं पालिकेच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

पूर्वी, अधिकाऱ्यांनी दिवाळीनंतर COVID 19 प्रकरणांमध्ये वाढ होण्याची भिती व्यक्त केली होती. तर प्रशासकिय संस्थेनं नागरिकांना दुसर्‍या लहरीपासून बचावासाठी खबरदारीच्या उपाययोजना सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे. पालिका तर सर्व प्रयत्न करत आहे. पण नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणं आवश्यक आहे. सार्वजनिक क्षेत्रात नागरिकांनी मास्क घालणं बंधनकारक असल्याचे आदेश देखील पालिकेनं दिले. पण नागरिक हा आदेश गांभिर्यानं घेताना दिसत नाहीत.

सध्या मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्स ५० टक्के क्षमतेनं खुली आहेत. विवाहसोहळा आणि इतर कार्यक्रम किंवा मेळाव्यात देखील केवळ ५० लोकांना परवानगी आहे.



हेही वाचा

कोरोना लसीवरील क्लिनिकल चाचणीसाठी सायन रुग्णालय मंजुरीच्या प्रतिक्षेत

कोरोनाशी लढण्यासाठी पालिकेनं खर्च केले १,०५० कोटी

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा