Advertisement

कोरोनाची लाट थोपवण्यासाठी मुंबईत मायक्रो-कंटेन्मेंट उपायांची सुरुवात

मुंबईतील रोजची कोरोना रुग्णांची वाढ ही चिंताजनक आहे. कोरोनाची ही लाट थोपवण्यासाठी पालिका सक्रीय झाली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी आता मुंबईत मायक्रो-कंटेन्मेंट उपायांची सुरुवात केली आहे.

कोरोनाची लाट थोपवण्यासाठी मुंबईत मायक्रो-कंटेन्मेंट उपायांची सुरुवात
SHARES

मुंबईतील रोजची कोरोना रुग्णांची वाढ ही चिंताजनक आहे. कोरोनाची ही लाट थोपवण्यासाठी पालिका सक्रीय झाली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी आता मुंबईत मायक्रो-कंटेन्मेंट उपायांची सुरुवात केली आहे. यामध्ये डी वॉर्डमधील अधिकाऱ्यांनी बाजारातील विक्रेते व फेरीवाल्यांची चाचणी करण्यास सुरवात केली आहे.

याबाबत डी वॉर्डचे प्रभाग अधिकारी प्रशांत गायकवाड म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून ग्रांट रोड येथील गिरगावच्या सदाशिव लेन आणि भाजी गल्ली येथे फेरीवाल्यांची चाचणी केली जात आहेत. अनेक लोक येथील बाजारपेठेत जात जातात.त्यामुळे येथील विक्रेते व दुकानदारांची कोरोना चाचणी केली जात आहे. हे विक्रेते कोविड वाहक असू शकतात. त्यामुळे आमची सूक्ष्म पातळीवर शोध मोहीम सुरू आहे. 

ते म्हणाले की, डी वॉर्डमध्ये या आधी उच्चभ्रूंमध्ये आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळली आहेत. तर आता मंगळवारी येथील झोपडपट्टीत तीन रुग्णांची नोंद झाली आहे. या ठिकाणी रोज कोरोनाचे ९० च्या आसपास रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.  

आर-सेंट्रल (बोरिवली) येथील प्रभाग अधिकारी भाग्यश्री खापसे यांनी सांगितलं की, प्रभागातील कोरोना बाधित भागाला भेट देणार्‍या आमच्या कर्मचार्‍यांची कोरोनाची रॅपि़ड टेस्ट आम्ही करत आहोत. नागरिक सुविधा केंद्राला दररोज शेकडो लोक भेट देत असतात. यामुळेही आम्ही या चाचण्या करत आहोत. तसंच बोरिवली रेल्वे स्थानकात डॉक्टरांची पथकेही कोरोना चाचण्या करत आहेत.

एम-पश्चिम प्रभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, आमच्या टीमला आधीच लग्न होणाऱ्या ठिकाणाच्या बुकिंगची माहिती दिली जाते. त्यामुळे त्यांना तयारीसाठी वेळ मिळतो. आणि या ठिकाणी नियम पाळले जात आहेत की नाही याची खात्री केली जाते. संबंधित पक्षाला दिलेल्या परवानग्या वॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केल्या जातात. परवानगी न घेता समारंभ होत असल्यास कारवाई केली जाते.

जी दादर आणि धारावी यांचा समावेश असलेल्या जी-वॉर्ड प्रभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या भागात आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी प्रक्रिया जलद करण्यासाठी या ठिकाणी बूथची स्थापना केली गेली आहे. 



हेही वाचा -

मुंबईत २३७७ नवे रुग्ण; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

मुंबईत लॉकडाऊन नाही, कडक निर्बंध लावणार - अस्लम शेख

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा