Advertisement

नवजात बाळांसाठी बीएमसी आयात करणार इंटेंसिव्ह केअर व्हेंटिलेटर्स

नवजात शिशुंच्या देखभालीसाठी व्हेंटिलेटर आयात (import) करण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गित मुलांसाठी तयार असलेल्या बालरोग विभागात हे व्हेंटिलेटर्स असतील.

नवजात बाळांसाठी बीएमसी आयात करणार इंटेंसिव्ह केअर व्हेंटिलेटर्स
SHARES

कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट आता ओसरत आहे. मात्र, तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या लाटेत लहान मुलांना (childrens) धोका असेल असं म्हटलं जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (mumbai municipal corporation) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्याची तयारी सुरू केली आहे. 

मुंबई महापालिकेने नवजात बाळांसाठी (Newborn baby) अर्जेंटिना (Argentina) मधून २२ इंटेंसिव्ह केअर व्हेंटिलेटर्स (Intensive care ventilators) आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. नवजात शिशुंच्या देखभालीसाठी व्हेंटिलेटर आयात (import) करण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गित मुलांसाठी तयार असलेल्या बालरोग विभागात हे व्हेंटिलेटर्स असतील. टेकमे निर्मित या प्रत्येक व्हेंटिलेटरची किंमत १३ लाख रुपये आहे.

दोन महिन्यांत व्हेंटिलेटर (ventilators) बसविणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतेच नवजात बाळांच्या देखभालीसाठी व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देण्यास मान्यता दिली आहे. गंभीररित्या आजारी असलेल्या नवजात शिशुंसाठी किंवा श्वसनाच्या अडचणी असलेल्या मुलांच्या देखभालीसाठी हे व्हेंटिलेटर वापरण्यात येतील. हे व्हेंटिलेटर्स कोरोना रुग्णालये, जुन्या आणि नवीन जंबो सेंटरमध्ये बसवले जातील. या केंद्रांमध्ये मुलांसाठी कोरोना वॉर्ड (corona ward) असतील.



हेही वाचा - 

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची होणार सखोल चौकशी

माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा NIAच्या ताब्यात, चौकशी सुरू

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा