Advertisement

तपासणीशिवाय कोरोना चाचणीची चिठ्ठी दिल्यास डॉक्टरांवर कारवाई

शारीरिक तपासणी केल्याशिवाय कोरोना चाचणीची चिट्टी देणं आता खासगी डॉक्टरांना चांगलचं महागात पडणार आहे.

तपासणीशिवाय कोरोना चाचणीची चिठ्ठी दिल्यास डॉक्टरांवर कारवाई
SHARES

शारीरिक तपासणी केल्याशिवाय कोरोना चाचणीची चिट्टी देणं आता खासगी डॉक्टरांना चांगलचं महागात पडणार आहे. अशा डॉक्टरची वैद्यकीय नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. तसंच त्याच्या विरोधात कायदेशीर गुन्हा नोंदवण्याचा इशाराही मुंबई महापालिकेने दिला आहे.

खासगी किंवा सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यासाठी डॉक्टरची चिठ्ठी असणं बंधनकारक आहे. पालिकेच्या चाचणी नियमावलीचे योग्य पालन केले जात आहे का याची जबाबदारी वार्डमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर पालिकेने सोपविली आहे. स्थानिक खासगी डॉक्टरांनी दुसऱ्या विभागातील रुग्णांची शारीरिक तपासणी न करताच करोना चाचणी करण्याची चिठ्ठी दिल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला आढळल्यास त्या डॉक्टरविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. डॉक्टरची वैद्यकीय नोंदणी रद्द केली जाईल किंवा स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला जाईल असे या कारवाईचे स्वरूप असल्याचे आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान, कोरोनाचे प्राथमिक निदान करण्यासाठी शारीरिक तपासणी करणे बंधनकारक असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने(आयसीएमआर) आदेश दिलेले नाही. संसर्ग प्रसार होऊ नये म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने टेलीमेडिसीनद्वारे उपचार करण्याचे अधिकार डॉक्टरांना दिले आहेत. तेथे पालिके ने शारीरिक तपासणी करण्याचा आग्रह धरणे नियमाबा असल्याचा आक्षेप असोसिएशन ऑफ मुंबई कन्सलटंटसने(एमसी) नोंदविला आहे. पालिकेने हा आदेश मागे घेण्याची मागणी एमसीने केली आहे.



हेही वाचा -

महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन मार्गदर्शक तत्वं, वाचा...

१ जूनपासून २०० नॉन एसी रेल्वेगाड्या नियोजित वेळेनुसार धावणार




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा