Advertisement

कोरोना मृत्यूचे आकडे ४८ तासात न दिल्यास कारवाई, पालिकेचा रुग्णालयांना इशारा

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती पालिकेकेला ४८ तासांच्या आत देणं बंधनकारक असल्याचे आदेश ८ जूनला आदेश देण्यात आले होते. मात्र, अनेक रुग्णालयांनी मृतांची माहिती दिली नाही.

कोरोना मृत्यूचे आकडे ४८ तासात न दिल्यास कारवाई, पालिकेचा रुग्णालयांना  इशारा
SHARES

कोरोना रुग्णांच्या मृत्यूची माहिती महापालिकेला ४८  तासांच्या आत दिली नाही तर रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे.  ४८ तासानंतर नोंद केल्यास संबंधित हॉस्पिटलवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात  येणार आहे. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची माहिती पालिकेकेला ४८ तासांच्या आत देणं बंधनकारक असल्याचे आदेश ८ जूनला आदेश देण्यात आले होते. मात्र, अनेक रुग्णायांनी मृतांची माहिती दिली नाही.  महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अशा रुग्णालयांना आता शेवटची संधी दिली आहे. या नुसार एखाद्या रुग्णालयाच्या स्तरावर अशी माहिती प्रलंबित असल्यास त्यांनी सदर माहिती  ४८ तासात बृहन्मुंबई महानगर पालिकेकडे कळवावयाची आहे. शेवटची संधी देऊनही कोविड बाधित रुग्णांच्या मृत्यूची माहिती महापालिकेकडे न कळविल्यास अशा रुग्णालयांवर 'साथरोग नियंत्रण कायदा १८९७ नुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.  

मुंबईतल्या ८६२ कोरोना रुग्णांच्या मृत्यू प्रकरणानंतर मुंबई महापालिका आयुक्तांनी नवीन परिपत्रक काढून रुग्णालयांना कारवाईचा इशारा दिला आहे. मुंबईत आणि राज्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.  यानंतर प्रशासकीय यंत्रणांकडून मुंबईतील ८६२ आणि राज्यातील ४६६ कोरोना मृतांचे आकडे नव्याने जाहीर करण्यात आले.



हेही वाचा -

महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी विशेष बेस्ट बससेवा बंद

Coronavirus Updates : यंदा पदवी परीक्षा होणार नाहीत?




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा