Advertisement

मुंबई महापालिका कोविड रुग्णालये चालूच ठेवणार

कोरोनाच्या काळात मुंबईत बेड्सची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेने काही रुग्णालये फक्त कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवली होती. तसंच खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात आली होती.

मुंबई महापालिका कोविड रुग्णालये चालूच ठेवणार
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन पूर्वतयारीचा भाग म्हणून मुंबई महापालिका कोविड रुग्णालये सुरुच ठेवणार आहे. 

कोरोनाच्या काळात मुंबईत बेड्सची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे महापालिकेने काही रुग्णालये फक्त कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवली होती. तसंच खासगी रुग्णालयांची मदत घेण्यात आली होती. याशिवाय वांद्रे-कुर्ला संकुल, वरळी येथील डोम, गोरेगाव येथील नेसको सेंटर, भायखळा येथील रिचर्डसन क्रुडास, मुलुंड आणि दहिसर या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाची रुग्णालये उभारण्यात आली होती.

मागील काही दिवसांत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढल्याने मोठ्या प्रमाणात बेड रिकामे झाले आहेत. त्यामुळे महापालिका काही कोविड रुग्णालये बंद करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता कोविड रुग्णालये बंद करणार नसल्याचं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

याबाबत मुबंई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं की, कोरोना काळात रुग्णांसाठी सुरु करण्यात आलेली सर्व रुग्णालये चालूच राहणार आहे. तसंच मोठ्या प्रमाणात पूर्वतयारीही करण्यात आली आहे. काही कंत्राटी पद्धतीवर आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यात डॉक्टरही आहेत. त्यापैकी काहींचे कंत्राट वाढविण्याची प्रक्रिया सुरु आहे. तर जेथे अगदीच गरज नाही तेथे काम थांबविण्यात आले आहे. परिस्थिती बघून निर्णय घेण्यात येत आहे.



हेही वाचा -

मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई अधिक तीव्रतेनं करा- पालिका आयुक्त

मुंबईत बुधवारी ‘या’ ७ भागात येणार नाही पाणी


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा