Advertisement

कोरोना लसीकरणासाठी बीमसी ६ हजार कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण

मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. लसीकरणासाठी पालिकेने सोमवारपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरु केलं आहे.

कोरोना लसीकरणासाठी बीमसी ६ हजार कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण
SHARES

मुंबई महापालिकेने कोरोना लसीकरणाची तयारी सुरू केली आहे. लसीकरणासाठी पालिकेने सोमवारपासून आरोग्य कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरु केलं आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईत ६१८२ कर्मचाऱ्यांना पालिका प्रशिक्षण देणार आहे. सोमवारी ७० मास्टर प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं.

पालिकेने लसीकरणासाठी रुग्णालयांना सेंटर बनवलं आहे. केईएम, शीव, नायर, कूपर, वांद्रे भाभा रुग्णालय, व्ही. एन. देसाई, राजावाडी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. मुंबईकरांना कोरोनाची लस या ८ केंद्रातून टोचली जाणार आहे. तसंच  कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५ हजार चौरस फूट क्षेत्र असलेल्या जागेवर कोरोनाची लस साठवली जाणार आहे.  

लसीकरणासाठी कोविड पोर्टलवर ८० हजार लोकांचा डेटा अपलोड केला गेला आहे. एकूण १ लाख २६ हजार ३७८ लोकांचा डेटा अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, चालक, बेस्ट कर्मचारी, स्मशानभूमीत काम करणारे लोक आणि इतरांना लसीकरण केले जाणार आहे.

सामान्य नागरिकांमध्ये ५० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक आणि कोरोनामुळे प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यांचा डेटा २५ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केला जाईल.



हेही वाचा-

महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 'स्मार्ट सहेली' योजना

मुंबई-ठाण्यात पोलिसांची संचारबंदी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा