Advertisement

बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरला कोरोनाची लागण

बॉम्बे हॉस्पिटलमधील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरला कोरोनाची लागण
SHARES

बॉम्बे हॉस्पिटलमधील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या डॉक्टरने अनेक रुग्ण आणि गर्भवती महिलांवर उपचार केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी बॉम्बे हॉस्पिटल सील करावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

 बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडिओलॉजी विभागात काम करणाऱ्या डाॅक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. अनेक रुग्ण आणि गर्भवती महिलांवरही उपचार केले असल्याचं समोर आलं आहे.  डॉक्टरसह त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांची, त्याचे कुटुंबीय, नातेवाईकांची आणि रुग्णालयातील सर्व स्टाफची तापसणी करण्याची मागणी होत आहे. तसंच हॉस्पिटलसह आजूबाजूचा एक किलोमीटरचा परिसरही सील करण्याची मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे. 

दरम्यान, राज्यात रविवारी रात्री उशिरापर्यंत कोरोनाच्या २२१ नवीन रुग्णांची नोंद झाली.त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता १९८२ झाली आहे. सध्या राज्यात ६१ हजार २४७ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ५०६४ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आतापर्यंत प्रयोगशाळेत पाठवलेल्या ४१ हजार१०९ नमुन्यांपैकी ३७ हजार ९६४ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर १९८२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.



हेही वाचा -

जी दक्षिण विभागात २५० कोरोनाग्रस्त

मुंबईसहीत ८ जिल्हे रेड झोनमध्ये, पुढं काय होणार?




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा