Advertisement

इथे मिळतील स्वस्त औषधं...


SHARES

बोरीवली - आजारपण म्हटलं की आपल्याला सर्वात जास्त टेन्शन असतं ते औषधांवर होणाऱ्या खर्चाचं. पण,  तुम्हाला अव्वाच्या सव्वा किंमतीत मिळणारी औषधी अगदी स्वस्तात उपलब्ध झाली तर? घाबरू नका. ही कोणतीही फसवणारी स्कीम नसून थेट केंद्र सराकारचीच योजना आहे आणि ही औषधं म्हणजे जेनेरिक अर्थात जनौषधं. अगदी साध्या सर्दी पडशापासून थेट कर्करोग, ह्रदयरोगापर्यंतच्या मोठ्या आजारांवर ही औषधं उपलब्ध आहेत.
देशभरात 3000 जनऔषधी केंद्र अर्थात स्टोअर्स सुरू करण्यात येणार आहेत. ब्रॅण्डेड औषधांना पर्याय म्हणून स्वस्तातली 700 जेनेरिक औषधं उपलब्ध होणार आहेत. दर पाच किमी अंतरावर एक जेनेरिक मेडिकल स्टोअर असणार आहे. शासकीय यंत्रणा, सेवाभावी संस्था आणि खासगी दुकानही सुरू करता येणार आहेत. जेनेरिक औषधांचं दुकान सुरू करण्यासाठी अडीच लाखांची सबसिडी मिळणार आहे. गेल्या दोन वर्षांत मुंबईत दोन, नवी मुंबईत एक तर ठाण्यात अशा प्रकारच्या जेनेरिक औषधांची 2 दुकानं सुरु करण्यात आली आहेत. राज्यभरात ही संख्या 53 आहे.बोरीवली पश्चिम येथील जनऔषधी दुकानात अशा प्रकराची औषध उपलब्ध आहेत. अख्ख्या मुंबईतलं हे दुसरं मेडिकल स्टोर आहे. मुंबईत आतापर्यंत दोन जनऔषधी दुकानं सुरू झाली असून लवकरच या दुकानांची संख्या वाढणार आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा