Advertisement

रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

रश्मी ठाकरे रुग्णालयात दाखल
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  तेव्हापासून त्या होम क्वारंटाईन होत्या. होम क्वारंटाईनमध्ये असताना त्यांना खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात हलवण्यात आलं.  

रश्मी ठाकरे यांना दक्षिण मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महत्वाचं म्हणजे ११ मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांनाही कोरोना झाला. कोरोना झाल्याचे कळल्यापासून आदित्य होम क्वारंटाईन झाले होते. 

आदित्य ठाकरेंच्या संपर्कात असल्याने रश्मी ठाकरे यांचीही चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर त्या विलगीकरणात राहत होत्या. यानंतर जेमतेम आठवड्याभराने त्यांना खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

  1. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा भूमिपूजन सोहळा

  1. पुन्हा लाॅकडाऊन आणून लोकांना त्रास देऊ नका- संजय निरूपम

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा