Advertisement

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान कराल तर...

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी तंबाखूजन्य पदार्थबंदीसाठीच्या कोटपा कायद्याची माहिती पोलिसांना व्हावी यासाठी नवी मुंबईच्या पोलिसांसाठी शिबिराचं आयोजन केलं होतं. यामुळे आता यापुढे सार्वजनिक ठिकाणी कुणी धुम्रपान करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई कडक कारवाई केली जाऊ शकते.

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान कराल तर...
SHARES

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी असताना अनेक व्यसनी मंडळी सहज सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना दिसतात. याचा स्वत:सोबत दुसऱ्याच्या आरोग्यावरही परिणाम होतो. यामुळे गंभीर आजार म्हणजेच कर्करोग, श्वासाचे विकार आणि हृदय रोग होतात. याच पार्श्वभूमीवर, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी तंबाखूजन्य पदार्थबंदीसाठीच्या कोटपा कायद्याची माहिती पोलिसांना व्हावी यासाठी नवी मुंबईच्या पोलिसांसाठी शिबिराचं आयोजन केलं होतं. यामुळे आता यापुढे सार्वजनिक ठिकाणी कुणी धुम्रपान करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई कडक कारवाई केली जाऊ शकते.  


याविषयाचं पुस्तक प्रकाशित

मुंबईतील ५५ पोलिस अधिकाऱ्यांसाठी १७ एप्रिलला या शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षण शिबिरात नवी मुंबईच्या सीबीडी बेलापूर, एनआरआय पोलीस स्टेशन, कळंबोली, पनवेल, कामोठे, वाशी, रबाळे आणि खांदेश्वर या ठिकाणांहून पोलिस अधिकारी आले होते. कोटपा कायद्याची माहिती पोलिसांना व्हावी आणि त्याअंतर्गत कशापद्धतीने कारवाई करता येते याविषयावर एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आलं.

कोटपा कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिराती, छोट्या मुलांकडून विक्रीचं काम करून घेणं, शाळेच्या १൦൦ मीटर परिसरात कुठल्याही प्रकारचा व्यवसाय असेल तर कारवाई केली जाऊ शकते.

नवी मुंबईचे डीसीपी तुषार दोशींच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डीसीपी दोशी म्हणाले की, 'तंबाखूच्या वापरावरील खप आणि दुष्परिणाम कमी करण्यासाठी कोट्पा कायदा कोणत्या भूमिका बजावू शकतो या प्रशिक्षणाचा हेतू आहे'.


कायद्याची बंदी जरी असली तरी तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने तरुणाई व्यसनाच्या आहारी जाते. कोप्टा कायद्यांतर्गत कारवाई करता यावी म्हणून पोलिसांना या शिबिराच्या माध्यमातून कायद्याची माहिती दिली गेली, असं नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी सांगितलं.

तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करणाऱ्या ९५ टक्के मौखिक कर्करोग होण्याची शक्यता असते. ज्यामुळे मृत्यूचं प्रमाण सर्वात जास्त असतं. कर्करोग झाल्यास रुग्णांसह संपूर्ण कुटुंबियांवर याचा परिणाम होतो. त्यामुळे कर्करोगापासून बचाव करण्यापेक्षा हा आजार कसा होणार नाही, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कर्करोग मुक्तीच्या या लढ्यात आता पोलिसांचीही मदत मिळणार असल्याने तरुणाईला यापासून दूर करण्यास मदत होईल.

- डॉ. प्रशांत पवार , कर्करोग तज्ज्ञ, अपोलो रुग्णालय

महाराष्ट्रात दरदिवशी ५२९ लहान मुलं नव्याने तंबाखू व्यसनाला सुरू करतात. तर दरवर्षी साधारणतः एक लाख पाच हजार नवीन कर्करुग्णांची नोंद होते. पण, कोटपा कायद्याद्वारे तंबाखूसेवनाचं प्रमाण कमी करण्यास नक्कीच मदत होणार असल्याचं केअरिंग फ्रेंण्डस या स्वयंसेवी संस्थेचे निमेश सुमती यांनी सांगितलं.


हेही वाचा - 

युवापिढीत वाढलं तंबाखू व्यसनाचं प्रमाण

तंबाखूच्या पाकिटावर सावधगिरी बाळगणाऱ्या जाहिरातीला जास्त जागा द्या, डॉक्टरांची मागणी


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा