Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

मुंबईकरांनो, तुम्ही करून दाखवलत; रुग्णसंख्येत घट

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. वाढता प्रादुर्भाव कमी होत आहे.

मुंबईकरांनो, तुम्ही करून दाखवलत; रुग्णसंख्येत घट
SHARES

मुंबईकरांसाठी एक दिलासादायक व आनंदाची बातमी आहे. मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे. वाढता प्रादुर्भाव कमी होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कडक निर्बंध लावले. तसंच, मुंबई महापालिकेनं ही तातडीनं उपाययोजना करत मुंबईतील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवलं. त्यामुळं मुंबईकरांनो तुम्ही करून दाखवलत अशीच काळजी घेतल्यास कोरोना नक्कीच नाहिसा होईल.

मुंबईत आता शहर उपनगरातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा ६ लाख ५८ हजार ८६६ झाला असून बळींचा आकडा १३ हजार ४०८ झाला आहे. सध्या ५४ हजार १४३ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबईत दिवसभरात २३ हजार ५४२ चाचण्या करण्यात आल्या तर एकूण ५५ लाख १३ हजार ७८३ कोरोना चाचण्या कऱण्यात आल्या आहेत.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा  दर ८९ टक्के असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १११ दिवसांवर पोहोचला आहे. २६ एप्रिल ते २ मे पर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.६१ टक्के असल्याचे दिसून आले आहे. मुंबईतील झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात ९३ सक्रिय कंटेनमेंट झोन्स असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ८१४  आहे.

मुंबईत एप्रिलअखेरीस पासून दैनंदिन कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी केल्यामुळे रुग्णसंख्येत घट होताना दिसतेय आहे. मुंबईत सोमवारी (३ मे) अवघ्या २३ हजार ५४२ चाचण्या केल्या असता २६६२ रुग्णांचे निदान झाले. यापूर्वी, मुंबईत २५ एप्रिल रोजी दिवसभरात ४० हजार २९८ चाचण्या कऱण्यात आल्या होत्या, त्यात ५५४२ रुग्ण आढळले होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा