Advertisement

मुंबईत केईएम, शीव, कूपर, नायरसह ८ ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रे

मुंबईत नियमित लसीकरण कार्यक्रमांतंर्गत सद्यस्थितीत उपलब्ध असलेली वितरण यंत्रणा कोरोना लस वितरणासाठी वापरण्यात येणार आहे.

मुंबईत केईएम, शीव, कूपर, नायरसह ८ ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रे
SHARES

कोरोना लसीकरणास देशात लवकरच सुरुवात होणार आहे. मुंबई महापालिकेनेही लसीकरणासाठी संपूर्ण तयारी केली आहे. मुंबईत केईएम, शीव, नायर, कूपर, वांद्रे भाभा रुग्णालय, व्ही. एन. देसाई, राजावाडी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात लसीकरणाची तयारी करण्यात आली आहे. मुंबईकरांना कोरोनाची लस या ८ केंद्रातून टोचली जाणार आहे.

मुंबईत नियमित लसीकरण कार्यक्रमांतंर्गत सद्यस्थितीत उपलब्ध असलेली वितरण यंत्रणा कोरोना लस वितरणासाठी वापरण्यात येणार आहे. मध्यवर्ती लससाठा शीतगृहापासून लसीकरण केंद्रापर्यंत लस वाहतुकीसाठी पोलिस बंदोबस्त अंतर्गत अतिरिक्त वाहने तैनात करण्यात येणार आहेत.

लसीकरणासाठी कांजूरमार्ग येथे परिवार इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ५ हजार चौरस फूट क्षेत्र असलेल्या जागेवर कोरोनाची लस साठवली जाणार आहे.  जागतिक आरोग्य संघटनेसह केंद्र सरकारच्या नियमांनुसार ही कोविड स्टोरेज सुविधा विकसित करण्यात येत आहे.

कोल्ड स्टोअरेजसाठी आवश्यक तांत्रिक समितीची स्थापना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली आहे. या समितीमध्ये नॅशनल कोल्ड चेन रिसर्च सेंटरमधील तांत्रिक तज्ज्ञ तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील इतर तज्ज्ञ आणि यांत्रिकी व विद्युत विभागातील प्रतिनिधी कार्यरत आहेत.



हेही वाचा -

मोनोरेलचा महसूल वाढविण्यासाठी 'जाहिरातबाजी'

मुंबई महापालिका निवडणुक काँग्रेस स्वबळावर लढवणार - भाई जगताप



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा