Advertisement

मुंबईत पहिल्या दिवशी 'इतक्या' आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस

पालिकेच्या सायन, नायर, केईएम व कूपर, कांदिवली येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकाेपर राजावाडी, सांताक्रुझ येथील व्हि.एन.देसाई, वांद्रे येथील भाभा रुग्णालय व बीकेसी जम्बाे काेविड सेंटर येथे लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे.

मुंबईत पहिल्या दिवशी 'इतक्या' आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस
SHARES

मुंबईत १६ जानेवारीला कोरोना लसीकरणाला सुरुवात हाेणार आहे. पहिल्या दिवशी मुंबईतील ९ केंद्रामध्ये १२ हजार ५०० आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचं लक्ष्य मुंबई पालिका आराेग्य विभागाने ठेवलं आहे. 

पालिकेच्या सायन, नायर, केईएम व कूपर, कांदिवली येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकाेपर राजावाडी, सांताक्रुझ येथील व्हि.एन.देसाई, वांद्रे येथील भाभा रुग्णालय व बीकेसी जम्बाे काेविड सेंटर येथे लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. या केंद्रात लसीकरणासाठी ७२ बुथ असतील.

यामध्ये भाभा रुग्णालयात ४ बुथ, राजावाडी रुग्णालयात ५ बुथ, व्ही.एन.देसाई रुग्णालयात २ बुथ, कांदिवली डाॅ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात ६ बुथ, बीकेसी येथे १५ बुथ, सायन, नायर केईएम व कूपर रुग्णालयात प्रत्येकी १० बुथ तयार करण्यात आले आहेत. प्रत्येक बुथमध्ये वॅक्सीनेटर सह पाच जणांची टीम तयार करण्यात आली आहे.येणार आहे.

अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं की, कोराेना लसीकरणासाठी प्रत्येक बुथवर सुरक्षारक्षक, वअक्सीनेटर, वेरीफायर, मोबिलाइजर व आर्ब्जवर अशी पाच सदस्यांची टीम तयार असणार आहे. वॅक्सीनसाठी तीन खाेल्या असणार आहेत. वॅक्सीनसाठी प्रवेश घेण्यापूर्वी सुरक्षारक्षकाकडून थर्मल स्क्रीनिंग करण्यात येईल त्यानंतर लिस्टमध्ये नाव व मेजेस व आयडी याची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर माेबिलाइजर लसीकरणाची माहिती दिली जाणार आहे.

त्यानंतर काेविन साॅफ्टवेअरचा डाटामध्ये माहिती घेत सदर माहिती याेग्य आहे का? याची पाहणी केली जाणार आहे. व्हेरिफिकेशन ते लस घेण्याच्या या कालावधीला ७ ते १० मिनिटे लागणार आहेत. डाेस दिल्यानंतर सदर व्यक्तीला डाॅक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. सदर व्यक्ती ३० मिनिटे देखरेखीखाली राहणार आहे. यात एएफआय कीट यासहित इतरही औषधाेपचार असणार आहेत. यािशवाय प्रत्येक केंद्रात १० खाटा असणार आहेत यात २ खाटा या आयसीयूसहीत असणार आहेत.हेही वाचा -

सीरम लसीचा साठा वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना, महाराष्ट्राला मिळाले ९ लाख ६३ हजार कोरोना डोसेस

दिलासादायक! मुंबई-मडगाव एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंतसंबंधित विषय