coronavirus : धारावीतील कोरोना रुग्णाचा मत्यू, दिवसभरातील तिसरा बळी


coronavirus : धारावीतील कोरोना रुग्णाचा मत्यू, दिवसभरातील तिसरा बळी
SHARES

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीतील (Dharavi) ५६ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णाला सायन (Sion Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

देशभरात कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या १ हजार ७०० च्या पार गेली आहे. दिल्लीतील (Delhi) मरकज इथं झालेल्या परिषदेनंतर देशभरात कोरोना (Covid - 19) पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात धारावीत कोरोना रुग्ण सापडल्यानं मुंबईत खळबळ उडाली आहे.

हा ५६ वर्षीय व्यक्ती धारावीतील बलिगा नगर इथं राहत होता. २३ मार्च रोजी त्यांना ताप आणि इतर लक्षणं दिसत असल्यानं ते स्थानिक डॉक्टरांकडे गेले होते. त्यानंतर २६ मार्च रोजी त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर १ एप्रिल रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. म्हणजेच लक्षणं दिसल्यानंतर तब्बल ९ दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या व्यक्तीची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. त्यांचे एकेजी नगर इथं गार्मेंटचं दुकान आहे.

धारावी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर बालिगा नगर इथले ३०० फ्लॅट्स आणि ९० दुकानं सील करण्यात आली आहेत. याशिवाय हाय रिस्कमधील नागरिकांना क्वारंटाइनचा शिक्का लावण्यात आला आहे. या भागातील आजारी नागरिकांची तपासणी केली जात आहे. या भागातील नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानी नाही. तर खाण्याचे पदार्थ आणि रेशन बीएमसीकडून पुरवले जात आहे. जोपर्यंत हाय रिस्क असणाऱ्यांच्या चाचणीचा निकाल येत नाही तोपर्यंत कोणालाही घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्याचं प्रशासनाकडून सांगितलं आहे.हेही वाचा

दिलासादायक! ३ वर्षाच्या चिमुरडीची कोरोनावर मात

Coronavirus Update: मुंबईत १६ पॉझिटिव्ह रुग्ण, महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा ३२०

संबंधित विषय