Advertisement

दिलासादायक! ३ वर्षाच्या चिमुरडीची कोरोनावर मात

या व्यक्तीसह त्याच्या ३ वर्षांची मुलगी आणि पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.

दिलासादायक! ३ वर्षाच्या चिमुरडीची कोरोनावर मात
SHARES

महाराष्ट्रामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परंतु, दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण बरे होत असल्याची दिलासादायक बाब समोर येत आहे. कल्याणमधील एका 38 वर्षीय व्यक्तीनं कोरोनाला मात दिली आहे. त्यांना हॉस्पिटलतून डिस्चार्जही देण्यात आला आहे.

मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमधून या व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे. या व्यक्तीसह त्याच्या ३ वर्षांची मुलगी आणि पत्नीलाही कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. आता तिघेही कोरोनातून मुक्त झाले आहे. तिघांनीही कोरोनावर मात केली आहे.

ही व्यक्ती अमेरिकेतून भारतात परतली होती. काही दिवसांनंतर अचानक सर्दी, खोकला आणि घश्याचा त्रास होत होता. त्यानंतर या व्यक्तीला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कस्तुरबा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान या व्यक्तीची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. तसंच काही दिवसांनी त्याला आयसीयूमध्येही दाखल करण्यात आलं होतं. परंतु, हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. त्यानंतर कस्तुरबा रुग्णालयातून त्यांना जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.

या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यावर योग्य ती खबरदारी घेण्यात आली. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांची आणि कार्यालयातील सहकाऱ्यांना खबरदारी म्हणून दोन आठवडे होम क्वारंटाइन राहण्याची सूचना देण्यात आली होती.

दरम्यान कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील आकडा ३०० च्या वर गेला आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण अधिक आहेत. मंगळवारी एका दिवसात कोरोनाचे ५९ रुग्ण आढळळे. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.



हेही वाचा

महापालिकेकडून मुंबईतील 'इतकी' ठिकाणं सील

उपचारादरम्यान जसलोक रुग्णालयातील नर्सला कोरोनाची लागण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा