Advertisement

कोरोनाची रक्त चाचणी होत नाही, तर...

महाराष्ट्रात सध्या 3 ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे इथली राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर इथली वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठवले जातात.

कोरोनाची रक्त चाचणी होत नाही, तर...
SHARES

राज्यात संशयित रुग्णांची कोरोनासाठी तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही. त्या रुग्णाचा घशाचा द्राव ( 'नसो फैरिंजीयल स्वाब' ) घेऊन प्रयोगशाळेत पाठवला जातो, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.  


कोरोनाच्या चाचण्या लवकरच इथही

महाराष्ट्रात सध्या 3 ठिकाणी सुविधा असून मुंबईत कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा, पुणे इथली राष्ट्रीय विषाणू संस्था आणि नागपूर इथली वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या रुग्णांचे नमुने पाठवले जातात. अजून काही दिवसात ही सुविधा केईएम रुग्णालय, मुंबई, हाफकीन यांच्यासह चार ते पाच ठिकाणी वाढवण्यात येणार आहे. अशी महत्त्वाची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.


'रक्त तपासणी होत नाही'

कोरोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांची यादी व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत आरोग्य विभागाकडून हा खुलासा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत आहे. कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचं आरोग्य विभाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. नागरिकांनी अशा चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ४२ वर गेला आहे. बुधवारी सकाळी पुण्यामध्ये आणखी एकाची तपासणी पॉझेटिव्ह आली आहे. मंगळवारी मुंबईत देखील एका ६४ वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.



हेही वाचा

रस्त्यावर थुंकल्यास आता 1 हजार रुपयांचा दंड

जाणून घ्या, क्वारंटाईन- आयसोलेशन म्हणजे काय?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा