Advertisement

एका क्लिकवर मिळणार आयसीयू खाटा, व्हेंटिलेटरची माहिती


एका क्लिकवर मिळणार आयसीयू खाटा, व्हेंटिलेटरची माहिती
SHARES

कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळं मुंबईतील रुग्णालयातील आयसीयू खाटा व व्हेंटिलेटर कमी पडत आहे. अनेकांनी कोरोनाची बाधा झाल्यास आयसीयूची गरज भासते परंतु, उपलब्ध नसल्यानं त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळं रुग्णाना या आयसीयू खाटा व व्हेटिलेटरची माहिती मिळावी यासाठी महापालिकेनं 'एअर व्हेंटी' अॅपची निर्मिती केली आहे. या अॅपच्या माध्यमातून मुंबईतील कोणत्या रुग्णालयात खाटा उपलब्ध आहेत, याबाबत माहिती मिळणार आहे.

महापालिकेच्या 'एअर व्हेंटी' या अॅपमुळं मुंबईतील कोणत्या रुग्णालयात अति दक्षता विभागात किती खाटा व व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, याची माहिती मुंबईकरांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी आपल्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात हा अ‍ॅप कार्यान्वित केला. गूगल प्ले स्टोरवरून हे अ‍ॅप नागरिकांनी विनामूल्य डाउनलोड करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाच्या डॅशबोर्डसोबत हे अ‍ॅप संलग्न असणार आहे. या अ‍ॅपद्वारे मुंबईतील सर्व रुग्णालयांची माहिती मिळणार आहे. महापालिकेच्या अ‍ॅपवर या अ‍ॅपची लिंक व या अ‍ॅपवर महापालिकेच्या अ‍ॅपची लिंक उपलब्ध आहे. कोरोनाची सद्यस्थिती पाहता हे अ‍ॅप उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.

मुंबईतील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं रुग्णवाहिकांची संख्याही अपुरी पडत आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा लक्षात घेता महापलिकेनं या समस्येवर मात करण्यासाठी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिकांची संख्या १००वरून ४५०वर नेली. तसंच, आता या रुग्णवाहिका उबर अॅपवर उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीची मदत घेत आहे.



हेही वाचा -

मुंबईनजीकच्या ‘या’ शहरात पुढचे १५ दिवस कडक लाॅकडाऊन

एमपीएससी परीक्षांचं नवं वेळापत्रक जाहीर



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा