Advertisement

खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी रुग्णालयांच्या दुपटीहून अधिक ऑक्सिजनचा वापर


खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी रुग्णालयांच्या दुपटीहून अधिक ऑक्सिजनचा वापर
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. परंतु, राज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी रुग्णालयांच्या दुपटीहून अधिक ऑक्सिजनचा वापर केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळं याबाबत स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले आहे. सध्या राज्यात कोरोना रुग्णांसाठी प्रतिदिन ६०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा वापर होत असून, उपचाराधीन रुग्णांमधील ५ ते ६ टक्के रुग्णांना ऑक्सिजन देण्यात आला आहे. हे प्रमाण राज्यातील एकूण रुग्णांच्या १० टक्के एवढे आहे.

ऑक्सिजनच्या वापरासाठी खासगी रुग्णालयामध्ये दर आकारणी करण्यात येते, तर सार्वजनिक आरोग्ययंत्रणेमध्ये ऑक्सिजनसाठी दर आकारणी केली जात नाही. त्यामुळं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व रुग्णालयांना प्रतिदिन नेमका किती ऑक्सिजन लागतो याची माहिती घेण्याचे आदेश जिल्हा आरोग्य यंत्रणांना दिले आहेत.

राज्यातील ६५ ऑक्सिजन केंद्रांकडून किती प्रमाणामध्ये ऑक्सिजन दिला जातो, त्यामध्ये सर्व निकषांचे पालन होते का, यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आले आहेत. आरोग्य विभागाने राज्यातील वैद्यकीय ऑक्सिजनचा आढावा घेतला असता, सरकारी रुग्णव्यवस्थेच्या दुपटीहून अधिक ऑक्सिजनचा वापर खासगी रुग्णालयांत झाल्याचे आढळून आले आहे. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय