Advertisement

Coronavirus Update : कोरोनामुळे बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू

कोरोनामुळे एका बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

Coronavirus Update : कोरोनामुळे बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनामुळे मुंबईत आतापर्यंत १७८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात आणखी एका मृत्यूची बातमी समोर येत आहे. कोरोनामुळे एका बेस्ट कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.


उपचारा दरम्यान मृत्यू

१ एप्रिल रोजी या कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्याला मुंबईतील टिळक नगर इथल्या SRV हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. बेस्टमध्ये तांत्रिक विभागात हा कर्मचारी काम करत होता, अशी माहिती समोर आली आहे.


२४ तासात ११० रुग्ण

दरम्यान, मुंबईत आज 66 तर पुण्यात 44 रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात ११० रुग्ण आढळून आले आहेत. लॉकडाऊन असतानाही राज्यभरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे मुंबईत रुग्णांची संख्या आतापर्यंत २ हजार ८०१ वर पोहोचली आहे.


धारावी ठरतोय हॉटस्पॉट 

कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आशिया खंडात सर्वात मोठी झोपडपट्टी ठरलेल्या धारावीमध्ये बुधवारी आणखी ५ नवे रुग्ण सापडले आहे. हे पाचही जण मुकुंदनगरमध्ये सापडले आहे. धारावीतील मुकुंदनगरमध्ये आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.या परिसरातील रुग्णांचा आकडा हा १४ वर पोहोचला आहे तर संपूर्ण धारावीमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा ६० वर पोहोचला आहे. आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.


दादरमध्ये २१ रुग्ण 

तर दादर परिसरातही २ रुग्ण आढळले आहे. हे २ रुग्ण शिवाजी पार्क परिसरातील आहे. यात एका ७५ वर्षीय महिला तर ६९ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. दादरमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही २१ वर पोहोचली आहे.



हेही वाचा

'भाटिया'तील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३५ वर

मुंबई महापालिका 1 लाख कर्मचाऱ्यांची करणार कोरोना चाचणी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा