Advertisement

मुंबई महापालिका 1 लाख कर्मचाऱ्यांची करणार कोरोना चाचणी

मुंबई महापालिकेने आरोग्य सेवेत काम करणाऱ्या 1 लाख कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिका 1 लाख कर्मचाऱ्यांची करणार कोरोना चाचणी
SHARES

मुंबई महापालिकेने आरोग्य सेवेत काम करणाऱ्या 1 लाख कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी रात्रं-दिवस काम करत आहे. गरज पडल्यास हे कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये काम करताना दिसत आहेत.

या कर्मचाऱ्यांना रोज फिल्डवर काम करावे लागते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता दाट असते. मनात भिती ठेवूनच त्यांना रोज काम करावे लागते. कर्मचाऱ्यांच्या मनातील हीच भीती घालवण्यासाठी पालिका त्यांची कोरोनाची चाचणी करणार आहे.  16 किंवा 17 एप्रिलपासून ही चाचणी सुरू केली जाणार आहे.  यामध्ये आरोग्य सेवेतील 1 लाख कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. या चाचण्या 

रॅपिड टेस्ट पद्धतीने केल्या जाणार आहेत. या चाचणीमध्ये रक्ताचे नमुने तपासले जातात. या चाचणीचा निकालही लवकर येतो. केवळ अर्ध्या तासात या चाचणीत निकाल येतो. त्यामुळे एकाच दिवसात अनेक जणांची चाचणी करता येणे शक्य होते.  मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकांनी यांनी याबाबत सांगितलं की,  भारतातच किट मिळणे सोपे झालेलं इतक्या मोठ्या प्रमाणात या टेस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण या टेस्ट करण्याचा निर्णय घेत आहोत.



हेही वाचा -

दादरमध्ये आणखी २ जण कोरोनाग्रस्त

कोरोनाचे धारावीत ५ नवे रुग्ण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा