Advertisement

गूड न्यूज! भारतात कोरोना वॅक्सीनच्या ह्युमन ट्रायलला परवानगी, लवकरच...

१५ ऑगस्टपर्यंत कोरोनाचं वॅक्सीन येण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

गूड न्यूज! भारतात कोरोना वॅक्सीनच्या ह्युमन ट्रायलला परवानगी, लवकरच...
SHARES

कोरोना (Coronavirus Update) रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना आता एक दिलासादायक बातमी आहे. भारतात कोरोना विषाणूवरील लसीसाठीचे प्रयत्न आता मानवी चाचणीपर्यंत पोहोचले आहेत. १५ ऑगस्टपर्यंत कोरोनाचं वॅक्सीन येण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

देशात तयार झालेल्या COVAXIN लसीची जुलै महिन्यात माणसांवर चाचणी घेण्यात येणार आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली लस ही स्वदेशी बनावटीची म्हणजेच संपूर्णत: स्थानिकरीत्या तयार झालेली आहे. विषाणूला विलग करून, प्रयोगशाळेत ही लस तयार करण्यात आली आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीनं ही लस तयार केली आहे.

COVAXIN च्या क्लिनिकल वापरासाठी शासनाकडून ही मंजुरी मिळालेली दुसरी लस असल्याची माहिती समोर येत आहे. ICMR कडून ही लस भारतात लाँच केली जाऊ शकते असाही कयास लावला जात आहे.


७ जुलैला पहिल्यांदा ह्युमन ट्रायल करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. प्राण्यांवर या लसीची चाचणी यशस्वी आणि सुरक्षितपणे झाली आहे. त्यात कोरोना विषाणूला प्रतिकार करण्याची क्षमता असल्याचं सिद्ध झालं आहे.

प्राण्यांवर या लसीच्या चाचणीचे परिणाम कंपनीने सादर केले. ते समाधानकारक असल्याने लसीच्या मानवी चाचणीसाठी अनुमती देण्यात आल्याचं कंपनीच्या पत्रकात म्हटलं आहे. ही लस परिणामकारक आहे की नाही हे पाहण्यासाठी मानवी चाचणी घेण्यात येणार आहे.

सध्या जगात ज्या १२० टीम्स कोरोना व्हायरसवर लस तयार करण्याचा प्रयत्न करतायत, त्यातल्या चार गटांनी याच्या चाचण्या सुरू केल्या आहेत.

मार्च महिन्यात अमेरिकेतल्या seattle मधल्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या लशीचे माणसांवर प्रयोग सुरू केले. साधारणपणे कुठल्याही लशीचा आधी प्राण्यांवर प्रयोग केला जातो, पण या गटानं ती पायरी गाळलीय.

त्यानंतर इंग्लंडमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी माणसांवर या लशीचे प्रयोग सुरू केले. 800 लोकांवर हा प्रयोग केला जाणार आहे. त्यातल्या निम्म्या लोकांना कोरोनावर तयार कऱण्यात आलेली लस दिली जाईल. तर उर्वरीत जणांना मेनिंजायटिसवर काम करणारी लस दिली जाईल आणि मग याचे तुलनात्मक निकाल पाहिले जातील. सानोफी आणि GSK या औषध क्षेत्रातल्या दोन बड्या कंपन्या लस निर्मितीसाठी एकत्र आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांनी दोन लशींचे प्राण्यांवर प्रयोग सुरू केले आहेत.हेही वाचा

राज्यात कोरोनाचे ६३३० नवीन रुग्ण, रुग्ण बरे होण्याचा दर ५५ टक्क्यांपर्यत

रुग्णांकडून अतिरिक्त पैसे आकारल्याप्रकरणी नानावटी रुग्णालयावर गुन्हा दाखल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा