Advertisement

तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचं कोरोनामुळे निधन

मुंबईतील जीएसएमसीचे शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा करोनानं मृत्यू झाला आहे.

तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचं कोरोनामुळे निधन
SHARES

डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलिस हे आपला जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढा देत आहेत. सगळेच आपलं कर्तव्य चोख बजावत आहेत. कोरोनाशी दोन हात करता करता अनेक पोलिसांनी, डॉक्टर्सनी आपला जीव देखील गमावला. मुंबईतील अशाच एका तज्ज्ञ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील जीएसएमसीचे शल्यचिकित्सक आणि तज्ज्ञ डॉक्टर चित्तरंजन भावे यांचा करोनानं मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टर भावे हे कान-नाक-घसा तज्ज्ञ होते. या कठिण परिस्थितीतही त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी तत्परता दाखवत आपलं कर्तव्य बजावलं. कोरोना होण्यापूर्वी त्यांनी परेलच्या एक रुग्णालयात दोन ऑपरेशन केले होते. या ऑपरेशन नंतर बातमी समोर आली की, त्या रुग्णालयातील दोन वॉर्ड बॉय पॉझिटिव्ह आले. त्यानंतरच भावे यांना कोरोनाची लागण झाली असावी.  

कोरोनाची लक्षण आढळताच ते स्वत:च गाडी चालवत रहेजामध्ये उपचारासाठी दाखल झाले. रहेजा रुग्णालयाचे ते मेंबर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तात्कार उपचार सुरू करण्यात आले. गेल्या ८-९ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती अधिकच खराब जाल्यानं चार दिवस ते व्हेंटिलिटरवर होते. याशिवाय रहेजा रुग्णालयात त्यांनी अनेक शस्त्रक्रिया केल्या आहेत.

चित्तरंजन भावे हे इतर आजारांनी देखील त्रस्त होते. हायपरटेंशन, शुगर, बायपास सर्जरी, बीपी असे आजार त्यांना होते. त्यात त्यांना कोरोना झाला. या आजारांच्या गुंतागुंतीमुळे त्यांचा कोरोनाशी लढा अपयशी ठरला. अखेर रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.

भावे यांचं स्वत:चं क्लिनिक माहिम इथं आहे. याशिवाय ते पारेख नर्सिंग होम आणि इतर अनेक रुग्णालयातल्या रुग्णांची तपासणी करत होते. पारेख नर्सिंग होममध्ये ते गेल्या २६ वर्षांपासून रुग्णांची तपासणी करायचे. डॉक्टर भावे यांच्या मृत्यूनं मुंबईतील डॉक्टरांनी शोक व्यक्त केला. डॉक्टर भावे हे अतिशय हुशार आणि मनमिळावू होते. त्यांची उणीव आम्हाला कायम भासत राहील, अशी भावना डॉक्टरांनी व्यक्त केली.

चित्तरंजन यांच्या जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. चित्तरंजन यांना कोरोना झाल्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलीला क्वारंटाईन व्हावं लागलं.



हेही वाचा

मुंब्य्रात 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय

मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा