Advertisement

मुंबईतील वरळी कोळीवाड्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल


मुंबईतील वरळी कोळीवाड्याची कोरोनामुक्तीच्या दिशेनं वाटचाल
SHARES

मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात होती. दररोज आढळणाऱ्या रुग्णांमुळं वरळी कोळीवाडा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. परंतु, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या व विशेष पथकानं केलेल्या प्रयत्नांनंतर वरळी कोळीवाड्यात रुग्ण आढळण्याचं प्रमाणं कमी झालं आहे. कोळीवाड्याच्या ७० टक्के परिसरात मागील २० दिवसांपासून एकही रुग्ण आढळलेला नाही. कोळीवाड्याच्या १० ते १२ भागांतील म्हणजे सुमारे ६० ते ७० टक्के प्रतिबंधित क्षेत्र खुले करण्यात आले आहे. त्यामुळं मागील २ महिन्यांनंतर या परिसरानं मोकळा श्वास घेतला आहे.

पुढील अनिश्चित काळासाठी सामाजिक वावर, मास्क, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे नियम पाळावे लागणार आहेत. महापालिकेच्या जी-दक्षिण विभागातील वरळी कोळीवाडा, आदर्श नगर, जिजामाता नगर परिसर हा मुंबईतील करोनाबाधितांचा पहिला हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. कोरोना साथीच्या पहिल्या टप्प्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण या भागात सापडल्यानं हा परिसर खूप चर्चेत होता. या विभागातील रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत गेल्यानं महापालिकेनं हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. 

हेही वाचा - दिलासादायक: वरळी कोळीवाड्यातील 'इतके' टक्केभाग प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून मुक्त

विभागातील रुग्णांचे प्रमाण खाली आणण्यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनानं उपाययोजनांचा नवीन आराखडा राबवला. नागरिकांनीही त्यास सहकार्य केल्यानं रुग्णवाढ रोखता आली, अशी माहिती पालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. कोळीवाड्यातील १० ते १२ भाग तसेच जनता कॉलनीतील ६ ते ७ भाग प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आले आहेत. या विभागात ६०हून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कोरोनाचे ७६ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १४१३ नवीन रुग्ण आढळल्याने कोरोनाशी दोन हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत सोमवारी दिवसभरात ४० जणांचा मृत्यू झाला आहे. 

मागील दिवसांपासून मुंबईत कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत आहे. मृतांच्या एकूण संख्येत मंगळवारी भर पडली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३८ रुग्ण दगावले आहेत. तर २७ मे रोजी ३२ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्या पूर्वी २८ मे रोजी रोजी एकूण ३८ जण या आजाराला बळी पडल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.



हेही वाचा -

रेल्वे प्रवासी पासचा कालावधी वाढवून देण्याची प्रवासी संघटनेची मागणी

मुंबईच्या दिशेनं चक्रिवादळ, काय कराल आणि काय नाही?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा