Advertisement

नायरमध्ये आणखी २५ जणांवर कोरोना लसीची चाचणी

मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात कोरोनावरील लसीची चाचणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १०० जणांना लस देण्यात आली आहे.

नायरमध्ये आणखी २५ जणांवर कोरोना लसीची चाचणी
SHARES
मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात कोरोनावरील लसीची चाचणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही रुग्णालयांमध्ये प्रत्येकी १०० जणांना लस देण्यात आली आहे. आता नायर रुग्णालयात आणखी २५ जणांना कोरोनावरील कोविशिल्ड लस देण्यात येणार आहे. यासाठी रुग्णालयाने लस देण्यात स्वयंसेवकांच्या प्राथमिक टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत.
नायर रुग्णालयात पुढील आठवड्यापासून दुसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीचा डोस देण्यात येणार आहे. तर केईएममधील स्वयंसेवकांना २६ ऑक्टोबरपासून दुसरा डोस देण्यात येणार आहे. चाचण्यांच्या पहिल्याच दिवशी २० ते ४५ वयोगटातील तीन स्वयंसेवकांना डोस दिला होता. त्यांना आता २८ दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे.

नायर रुग्णालयात अतिरिक्त २५ जणांना कोविशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर पुढील टप्प्यात दुसऱ्या डोसची तयारी करण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. २८ सप्टेंबरला नायरमध्ये तीन स्वयंसेवकांना कोविशिल्डची लस देण्यात आली होती. या स्वयंसेवकांचा चार महिन्यांचा पाठपुरावा केला जाईल. या अभ्यासाचा संपूर्ण कालावधी फेब्रुवारी २०२१ पर्यंत असणार आहे.
हेही वाचा - 

कोरोना इफेक्ट : रुग्णांमध्ये आढळतोय मल्टीसिस्टम प्रक्षोभक सिंड्रोम

केंद्र सरकारची मोठी घोषणा! ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन सक्तीचा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा